नागपूर -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गुरूवारी राष्ट्रवादीचे उमेदवार विजय घोडमारे यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेसाठी हिंगणा येथे आले होते. यावेळी त्यांनी बोलताना राज्यातील युती सरकार आणि मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार टीका केला.
शरद पवार यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे ;
- महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर शहर हे सध्या गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जात आहे. नागपूरचा गुन्हेगारांची राजधानी म्हणून होत असलेला उल्ले यात आपल्या सर्वांचीच बदनामी आहे.
- राज्यातील सरकार हे शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यकारभार करत असल्याचे बोलत आहे. या सरकारने शिवस्मारकाची घोषणा केली. पंतप्रधानांच्या हाताने जलपूजन केले. मात्र पाच वर्षांत सरकार एक इंचही बांधकाम करू शकले नाही.
- शिवस्मारकाप्रमाणेच सरकारने इंदू मील येथील बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत देखील जनतेची फसवणूक केली, असा उल्लेख पवारांनी आपल्या सभेत केला आहे.
- भाजप सरकारचे काम म्हणजे, बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असे आहे. या सरकारचा सगळा भार हा फक्त घोषणा करण्यावर आहे.
- केंद्रातील नेते राज्यात प्रचारासाठी येतात आणि कलम 370, काश्मीर यावर बोलतात. हे विषय महत्वाचे असले तरी त्यांचा राज्याशी संबंध नाही, यामुळे त्यांनी येथील समस्यांवर बोलायला हवे.
हेही वाचा... पवारांचे नाव येताच ईडीला घाम फुटला- खा. कोल्हे
पवारांचे काश्मीर प्रश्नावर स्पष्टीकरण
मोदी आणि शहा सातत्याने पवारांचा उल्लेख 370 ला विरोध केला याबद्दल घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना पावार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आपला निर्णय 370 हटवण्याला नसून त्याच्या प्रक्रियेला आहे. म्हणजेच काश्मीरच्या जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता, असे सांगितले आहे.
राज्यातील समस्यांची सरकारला करून दिली आठवण