महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर: चिमुकलीवर अत्याचार व हत्या प्रकरणी आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी

कळमेश्वर येथील पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार आणि त्यानंतर तिच्या हत्येच्या घटनेनंतर नागरिकांकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

nagpur
नागरिकांकडून बंद ची हाक

By

Published : Dec 9, 2019, 12:47 PM IST

नागपूर- पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार आणि त्यानंतर तिच्या हत्येच्या घटनेनंतर आज कळमेश्वर येथे नागरिकांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळीच शहरात नागरिकांकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी जोर धरत आहे. यामुळे गावात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कळमेश्वर येथे वर्षीय चिमुकलीवर अत्याचार आणि त्यानंतर तिच्या हत्येच्या घटनेनंतर नागरिकांकडून बंद ची हाक

पीडित 5 वर्षीय बालिका शुक्रवारपासून लिंगा गावातील तिच्या घराजवळून बेपत्ता होती. ती गावातील एका भागात असलेल्या तिच्या घरातून त्याच गावात दुसऱ्या बाजूला असलेल्या तिच्या आजीच्या घरी गेली होती. मात्र, ती शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे कुटुबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. रविवारी सकाळी तिचा मृतदेह गावात असलेल्या एका शेतात दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळला होता. प्राथमिक दृष्ट्या मृत बलिकेवर अत्याचाराचे प्रयत्न झाल्याचे आढळून येत असले, तरी पोलीस प्रशासन शवविच्छेदनाच्या अहवालाची वाट बघत आहे.

या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तडकाफडकीने तपास करत संजय नामक आरोपीला अटक केली असली, तरीही कळमेश्वर तालुक्यातील लोकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. आज सकाळी कळमेश्वर येथे संतप्त नागरिकांनी मोर्चा काढून शहरातील बाजारपेठ आणि दुकाने बंद करण्यात आली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details