नागपूर -नागपूर जिल्हयातील मौदा येथे इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार ( Sexual harassment ) करून हत्या ( Murder minor student ) केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण ( area terror in mouda) आहे. या प्रकरणी मौदा पोलिसांनी आरोपीला अटक ( Mouda police arrested accused ) केली आहे. धीरज सुरेश शेंडे ( Dheeraj Suresh Shende ) असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणातील अल्पवयीन विद्यार्थिनी ही १५ वर्षांची आहे. ती शिकवणी वर्ग झाल्यानंतर आटोपून घरी जात असताना ही घटना घडली. आरोपी धीरज शेंडे याने तिला बळजबरीने मोटरसायकलवर बसवून कुही शिवारातील साळवा जंगलात नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. त्यानंतर मौदा पोलिसांनी तपास सुरू केला असता, यामध्ये मौदा येथील भामेवाडा येथील धीरज सुरेश शेंडे नामक आरोपीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.