नागपूर -शिवसेना कुणाची उद्धव ठाकरे यांची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या प्रश्नाचे उत्तर आद्यप मिलेलेले नाही. दोन्ही गटांकडून एकमेकांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडा-फोडी सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेने नंतर आता युवा सेनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्व विदर्भात युवा सेनेला मोठे खिंडार पाडले आहे. पूर्व विर्दभातील युवा सेनेच्या सात जिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा आदित्य ठाकरे जोरदार धक्का मानला जात आहे.
Youth Sena District President: युवा सेनेला भगदाड! तब्बल सात जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश - आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला पूर्व विदर्भात भले मोठे खिंडार पाडले आहे. एक- दोन नव्हे तर तब्बल सात जिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामध्ये चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकऱ्यांचा समावेश आहे.
सात जिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश - आदित्य ठाकरे यांची युवा सेनेला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात गेलेल्यांमध्ये चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे, नागपूर ग्रामीण युवासेना जिल्हाप्रमुम शुभम नवले, भंडारा युवासेना जिल्हाप्रमुख रोशन कळंबे, गडचिरोली युवासेना जिल्हाप्रमुख दीपक भारसाखरे, गोंदिया युवासेना जिल्हाप्रमुख कगेश राव, नागपूर युवतीसेना जिल्हाप्रमुख नेहा भोकरे, नागपूर ग्रामीण युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली वैद्य, भद्रावती चंद्रपूर जिल्हा समन्वयक नगरसेवक प्रफुल सरवान, नागपूर जिल्हा समन्वयक राज तांडेकर, रामटेक जिल्हा समन्वयक लखन यादव, कानाजी जोगराणा, अभिषेक गिरी, सुनील यादव यांचा समावेश आहे.