नागपूर- एकीकडे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीनशे पार झाली आहे. यामुळे, नागपुरकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. रविवारी कोरोनामुक्त झालेल्या 7 रुग्णांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नागपुरातील सातजण कोरोनामुक्त, आतापर्यंत जिल्ह्यातील 84 जणांना डिस्चार्ज - corona update etv bharat
रविवारी कोरोनामुक्त झालेल्या 7 रुग्णांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या सर्व रुग्णांच्या उपचारानंतर घेण्यात आलेल्या दोन चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर १९ मे रोजी सात रुग्णांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
corona file photo
या सर्व रुग्णांच्या उपचारानंतर घेण्यात आलेल्या दोन चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर १९ मे रोजी सात रुग्णांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सर्व सात रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
Last Updated : May 11, 2020, 12:10 PM IST