लातूर- शहरात सध्या कोरोना विषाणूबद्दल भीतीचे वातावरण आहे. कोरोना सर्वत्र पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्वत्रच राबवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे १० खाटाचा स्वतंत्र वॉर्ड उभारण्यात आला आहे. शिवाय वेगळा असा कर्मचारी वर्गही नेमण्यात आला आहे.
लातूर शासकीय रुग्णालयात कोरोना विषाणूसाठी स्वतंत्र वॉर्ड
शासकीय रुग्णालयात मूळचे चीनहून दाखल झालेल्या दोन तरुणांमध्ये कोरोनाची काही लक्षणे आहेत का, हे जाणून घेण्यासाठी त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली होती. त्यांनतर एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही. असे असतानाही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रुग्णालयात १० खाटांचा वॉर्ड उभारण्यात आला आहे.
शासकीय रुग्णालयात मूळचे केवळ चीनहून दाखल झालेल्या दोन तरुणांमध्ये कोरोनाचे काही लक्षणे आहेत का, हे जाणून घेण्यासाठी त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली होती. त्यांनतर एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही. असे असतानाही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रुग्णालयात १० खाटाचा वॉर्ड उभारण्यात आला आहे. यामध्ये आवश्यक असणारे मुखवटे (मास्क), औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे, नागरिकांनी घाबरून न जाता संशय वाटल्यास प्राथमिक तपासणी करून घ्यावी. तशी यंत्रणा शासकीय रुग्णालयात उभारण्यात आली आहे. शिवाय, कोरोनाचे संसर्ग होऊ नये यासाठी गरजेचे असलेले मुखवटे बाजारपेठेत उपलब्ध नसून नागरिकांनी शासकीय रुग्णालयातील मुखवटेच वापरावेत, असे रुग्णालय प्रशासनाने आवाहन केले आहे.
हेही वाचा-चिकन मधून कोरोना.. संभ्रम दूर करण्यासाठी लातुरात 'चिकन फेस्टिव्हल'चे आयोजन