नागपूर: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग (Dr Rani Bang) यांना नागपूरच्या सिम्स रुग्णालयात दाखल (Dr Rani Bang admitted to hospital in Nagpur) करण्यात आले आहे. वर्धेत एका कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या त्यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Dr Rani Bang : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ राणी बंग रुग्णालयात दाखल - डॉ राणी बंग
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग (Dr Rani Bang) यांना नागपूरच्या सिम्स रुग्णालयात दाखल (Dr Rani Bang admitted to hospital in Nagpur) करण्यात आले आहे. वर्धेत एका कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या त्यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
![Dr Rani Bang : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ राणी बंग रुग्णालयात दाखल Dr Rani Bang](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16946640-thumbnail-3x2-ranibang.jpg)
उपचार सुरू-समाजसेविका डॉक्टर राणी बंग गडचिरोलीत जिल्ह्यातील चातगाव येथील सर्च-शोधग्रामच्या प्रणेत्या आहेत. सुरवातीला त्यांना वर्धा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तब्येत आणखी खालावत असल्यामुळे अखेर नागपूरच्या सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मेंदूत रक्तस्त्राव: डॉ. राणी बंद यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याची माहिती समोर आली आहे. पुढील काही तास त्यांच्यावर अतिदक्षता विभागात ठेवले जाणार आहे. त्यानंतर उपचाराबाबत पुढचा निर्णय घेतला जाणार आहे.