महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रतीक्षा संपली..! ज्येष्ठ नागरिकांना ११ केंद्रांवर मिळणार कोरोना लस - नागपूर ज्येष्ठ नागरिक कोरोना लसीकरण न्यूज

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जानेवारी महिन्यात देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सला लस दिली जात आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना देखील कोरोनाची लस दिली जाणार आहे.

Vaccine
लसीकरण

By

Published : Mar 1, 2021, 7:36 AM IST

नागपूर - कोरोनापासून बचाव होण्यासाठी आरोग्य सेवक आणि फ्रंट लाईन वर्कर यांच्यासाठी लसीकरण सुरू आहे. या नियमित लसीकरणा सोबतच सोमवारपासून (१ मार्च) ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाला सुरुवात होत आहे. नागपूर शहरात ११ शासकीय केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे.

45 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याने कित्येक दिवसांपासून त्यांच्यासाठी लसीची प्रतीक्षा होती. मात्र, आता त्यांना लस दिली जाणार असल्याने प्रतीक्षा संपली आहे. ज्येष्ठ नागरिकांसोबतच गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या ४५ वर्षावरील व्यक्तींनाही लस घेता येणार आहे. १ मार्चपासून सुरू होणारे लसीकरण तूर्तास आरोग्य विभागाने निर्धारित केलेल्या ११ शासकीय केंद्रांवरच होणार आहे. पहिल्या टप्प्यात जे आरोग्य कर्मचारी अथवा फ्रंट लाईन वर्कर यांची नोंदणी न झाल्यामुळे लस घेऊ शकले नाही, त्यांनाही या केंद्रावर जाऊन नोंदणी करून लस घेता येणार आहे. शासकीय केंद्रांवर आज सकाळी ९ वाजतापासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार असल्याचे मानपाने सांगितले.

'या' शासकीय केंद्रावर होणार लसीकरण -

पाचपावलीला दोन केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयमध्ये दोन केंद्र, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय दोन केंद्र, झिंगाबाई टाकळी येथील पोलीस रुग्णालय, गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय, इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पिटल, एम्स, ईएसआयएस हॉस्पिटल या ठिकाणी लसीकरण होणार आहे. या केंद्रावर जाऊन ज्येष्ठ नागरिकांना लस घेता येईल. ही शासकीय केंद्रे लसीकरणासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहतील.


नोंदणी करण्यासाठी 'ही' कागपत्रे आणावीत सोबत -

ज्यांना लस घ्यायची आहे त्यांनी लसीकरण केंद्रावर आधार कार्ड घेऊन जायचे आहे. आधार कार्ड नसेल तर जन्मतारीख असणारे ओळखपत्रही नोंदणी ठिकाणी दाखवून नोंदणी करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात राहून गेलेल्या फ्रंट लाईन वर्कर यांना नोकरीचे ओळखपत्र आणि जे आरोग्य कर्मचारी आहे त्यांनी त्यांच्या रुग्णालयाचे ओळखपत्र दाखवून नोंदणी करवून घ्यायची आहे. प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन नोंदणी करता येईल. सोबतच ‘कोवीन’ अथवा ‘आरोग्य सेतू’ या ॲपद्वारेही घरबसल्या ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details