नागपूर - आज (मंगळवारी) सभागृहात जे घडले ते निंदनीय आहे. अशी प्रतिक्रिया भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जे आश्वासन दिलं होते आम्ही केवळ त्याचे स्मरण केल्याचेही मुनगंटीवार म्हणाले आहेत.
हिवाळी अधिवेशन : सभागृहात जे घडलं ते निंदनीय - सुधीर मुनगंटीवार - महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन
हिवाळी अधिवेशनाचा आज (मंगळवारी) दुसरा दिवस आहे. दुसऱया दिवशीही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून हमरातुमरी झाली.
हिवाळी अधिवेशनाचा आज (मंगळवारी) दुसरा दिवस आहे. दुसऱया दिवशीही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून हमरातुमरी झाली. विधिमंडळ हे चर्चा आणि संवादातून जनहिताचे निर्णय करणारे भवन आहे. या इमारतीत आपल्या मनाला पटत नसेल तर त्याच उत्तर शब्दाने दिले पाहिजे हा अहंकार आहे, उन्मुक्त आहे, हा अहंकार टिकत नाही. तर मुद्द्याचा सभागृह आहे त्यांनी जे आश्वासन दिले त्याची आठवण करून देत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. यावेळी त्यांनी 'ईटीव्ही भारत' सोबत संवाद साधला.
हेही वाचा -या देशात सामान्यांचे जगणे महाग आणि मरण स्वस्त झालंय ! शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका