नागपूर- येथील केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने संत्र्याच्या दोन आणि मोसंबीच्या चार अशा सहा नव्या प्रजाती विकसित केल्या आहेत. विशेष म्हणजे त्या सर्व बियाविरहीत (सिडलेस) आहेत. फक्त एक किंवा दोनच बिया यात असून येत्या चार ते पाच वर्षात ही फळे विदर्भातील बाजारपेठेत उपलब्ध होणार आहेत.
नागपुरी संत्रा आणि मोसंबीला पर्याय म्हणून या नवीन बियाविरहीत फळांकडे बघितले जात आहे. संत्र्यामध्ये डेजी आणि पर्ल टैजैंलो या नवीन जाती विकसित करण्यात आल्या आहेत. डेजी हा संत्रा फळ असून विदर्भातील वातावरणात याचे उत्पादन चांगले आणि लवकर घेता येणार आहे. संत्र्याचे झाड जस-जसे वाढेल तसे उत्पादन देखील वाढेल, अशा प्रकारचे हे फळझाड आहे.