महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी शहर आणि ग्रामीणमध्ये कोरोना मृत्यू दर शून्य - नागपूर कोरोना अपडेट

नागपूर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून निर्बंध हटू लागले आहेत. यात मृत्यूच्या संख्येत घट होताना ग्रामीण भागात मागील सात दिवसात शून्य मृत्यूची नोंद होत झाली आहे. तेच तब्बल साडे चार महिन्याने सलग दुसऱ्या दिवशी शहरात एकही मृत्यू नाही.

Nagpur corona death rate
Nagpur corona death rate

By

Published : Jun 19, 2021, 10:40 PM IST

नागपूर - नागपूर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून निर्बंध हटू लागले आहेत. यात मृत्यूच्या संख्येत घट होताना ग्रामीण भागात मागील सात दिवसात शून्य मृत्यूची नोंद होत झाली आहे. तेच तब्बल साडे चार महिन्याने सलग दुसऱ्या दिवशी शहरात एकही मृत्यू नाही. यामुळे नक्कीच मोठा दिलासा नागपूरकरांना मिळताना दिसून येत आहे. तेच रिकव्हरी रेट 97.90 वर जाऊन पोहचला असताना पॉझिटिव्हिटी रेट हा 0.2 वर येऊन पोहचला जो एप्रिल महिन्यात 34 टक्के इतका होता.

नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी आलेल्या अहवालात 9 हजार 017 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 16 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये शहरी भागात 8 तर ग्रामीण भागात 7 बाधित रुग्ण मिळून आले आहे. शहर आणि ग्रामीण भागात मृत्यू नसून बाहेर जिल्ह्यात एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तेच 115 जणांपैकी शहरात 80 तर ग्रामीण 35 जण कोरोना मुक्त झाले आहे. यात 223 जण हे रुग्णालयात उपचार घेत असून 779 रुग्ण हे होम आयसोलेशन मध्ये आहे.

मृत्यूची संख्या उपराजधानीत 1 तर पूर्व विदर्भात 3 जणांचा मृत्यू -

आतापर्यंत सक्रिय रुग्णसंख्येत घटून 1 हजार 002 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 4 लाख 76 हजार 722 जण रुग्ण कोरोना बाधित झाले आहे. यातून 4 लाख 66 हजार 521 जण हे कोरोनामुक्त झाले आहे. यात मृत्यूचा आकडा हा 9017 वर जाऊन पोहचला आहे. नागपूरात सध्या रिकव्हरी रेंट हा 97.90 टक्क्यांवर वर असून रोज यात वाढ होत आहे.

विदर्भातील सहा जिल्ह्यात १२० बाधित तर 341 कोरोनामुक्त -

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 341 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 120 नवीन बधितांची नोंद झाली आहे. 3 जण हे कोरोनाचे बळी ठरले आहेत. यात बाधितांच्या तुलेनेत 221 अधिकचे रुग्ण हे कोरोमुक्त झाले आहेत. यात नागपूरचा पॉझिटिव्हीटी दर 0.2 टक्के, विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होत 0.63 वर आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details