महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, पालिका आयुक्तांचे आदेश - nagpur breaking news

राज्यात २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाकडून शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर महापालिका क्षेत्रातील शाळाही १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत.

नागपूर महापालिका
नागपूर महापालिका

By

Published : Nov 21, 2020, 10:06 PM IST

नागपूर - राज्यातील ९ ते १२पर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. मात्र, अनेक जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाकडून शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे पाठोपाठ आता नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील शाळाही १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. या संदर्भातील अध्यादेश आजच महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केले आहे. शहरातील वाढत्या रूग्णसंख्येच्या अनुषगांने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे अध्यादेशात सांगण्यात आले आहे.

राज्यातील शाळा सुरू करण्याच्या मुद्यावरून विविध पैलू समोर येत आहे. यात काही शहरांमधे वाढती कोरोना रूग्णसंख्या लक्षात घेता शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेत आहे. नागपूर जिल्ह्यातही शाळा सुरू करण्याची तयारी प्रशासन करत आहे. मात्र, शहरातील शाळा या १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहे, असा अध्यादेश महापालिकाडून जारी करण्यात आला आहे. कोरोनाची दुसरी लाट व शहरातील दिवाळीनंतर वाढत असलेली रूग्णसंख्या या पार्श्वभूमीवर हा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. शिवाय भविष्यातील खबरदारी म्हणून धोका टाळण्यासाठी हे निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आल्याचे या अध्यादेशात सांगण्यात आले आहे. त्यामुळे इतर शहरांपाठोपाठ आता नागपुरातील शाळाही बंदच राहणार आहेत. अस असले तरी विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण प्रणाली कायम सुरू राहणार आहे. शिवाय १० वी व १२ वी च्या पुरणी परिक्षेतही कोणत्याही अडचणी येणार नाही, असेही या अध्यादेशात सांगण्यात आले आहे. त्यामुळे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांनी या अध्यादेशाचे पालन करावे, अशा सूचनाही महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details