नागपूर-दत्तोपंत ठेंगडी यांचा जन्मशताब्दी सोहळा संघाच्या स्मृतीभवनमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. राम होते की नव्हते हे 8 हजार वर्षानंतर विचारणारे लोक सुद्धा मिळतात. याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे आता रामा सारखे लोक राहिलेले नाहीत, असे मत यावेळी भागवत यांनी व्यक्त केले आहे.
राम होते की नव्हते हे 8 हजार वर्षानंतर विचारणारे लोक आहेत- सरसंघचालक मोहन भागवत - NAGPUR LATEST NEWS
दत्तोपंत ठेंगडी यांचे संघात असलेले मोलाचे काम समाजापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून या जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात झाले. वर्षभर हे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे.
दत्तोपंत ठेंगळी जन्म शताब्दी उदघाटन सोहळा नागपूरच्या रेशीमबाग येथील संघाच्या स्मृतीभवनमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि मुरलीमनोहर जोशी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दत्तोपंत ठेंगडी यांच्या जीवनातील वेगवेगळ्या पैलूंवर सुद्धा प्रकाश टाकण्यात आला. त्याचप्रमाणे संघात त्यांनी कसे काम केले आणि संघाच्या विचारसरणीत प्रत्येक समाज घटकाला त्यांनी कसे जोडले यावर सुद्धा प्रकाश टाकण्यात आला. दत्तोपंत ठेंगडी यांचे संघात असलेले मोलाचे काम समाजापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून या जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात झाले. वर्षभर हे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे.