नागपूर -सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण ( OBC reservation ) दिलेलं आहे. केवळ 93 नगरपालिकेचा संदर्भात काही तांत्रिक कारणाने समावेश ओबीसी राजकीय आरक्षणमध्ये झाला नाही. निश्चितपणे आज त्या 93 नगरपालिकें संदर्भात ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळेल ( OBCs will get political reservation in municipalities ) अशी आशा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( BJP State President Chandrasekhar Bawankule ) यांनी व्यक्त केली आहे,ते आज नागपूर विमानतळावर बोलत होते.
काँग्रेस,राष्ट्रवादीच्या दबावाखाली उद्धव ठाकरे -अफजलखानाच्या कबरी शेजारी असलेल्या अतिक्रमण काढण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या काळात ते अतिक्रमण काढायला सांगितलं, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली त्यांनी कारवाई केली नाही. शिंदे-फडणवीस सरकारने तात्काळ अतिक्रमण काढलं त्यासाठी बावनकुळे यांनी सरकारचे अभिनंदन केले आहे.