नागपूर : संजय राऊत सरकारवर आरोप करत म्हणाले की, "दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एसआयटीची स्थापन करायची असेल तर करा. हा तपास सीआयएकडे द्यायचा असेल तर द्या, केजीबीकडे द्याचा असेल तर द्या. आपल्या राजकीय विरोधकांच्या संदर्भात खोटे भ्रम निर्माण करायचे, बदनामी करायची आणि आपली राजकीय पोळी भाजायची. आम्ही त्यांना भीक घालत नाही, त्यांना एसआयटी करायची आहे. चौकशी करा लाखो लोक शिवसेनेत आहेत. प्रत्येकामागे एसआयटी लावा, 'राज्यात कायदा सुव्यवस्थेची धूळधाण उडाली याबद्दल कुणी काही बोलू नका' असा सरकारचा कारभार सुरू आहे. 2024 नंतर सरकार बदलणार आहे, कोणी सत्तेचा अमर पट्टा बांधून आलेला नाही, हे टेम्पररी आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले.
मागासवर्ग आयोगअध्यक्षपदाचा राजीनामा : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर दबाव येत होता, आधी सदस्यांनी राजीनामे दिले आता मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षाने राजीनामा दिला. त्यांनी आठ दिवसांपूर्वी राजीनामा दिला, एवढे दिवस ही बाब का लावपून ठेवली. विशिष्ट अहवाल देण्यासाठी आयोगावर दबाव येत होता. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला, असा आरोप राऊत यांनी केला.