महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Saffron Farming Nagpur: उच्चशिक्षित तरुण दाम्पत्याने घरातचं फुलवली 'केशर'शेती - होले दाम्पत्याने फुलविली केशर शेती

Saffron Farming Nagpur: नागपूर शहरातील एका तरुण दाम्पत्याने केवळ चार बाय चारच्या एका बंद खोलीत चक्क 'केशर'ची शेती फुलवली आहे. (Saffron Production in Nagpur ) अवघ्या पाच महिन्यात केशर शेतीच्या माध्यमातून या तरुण दाम्पत्याला तब्बल ८ लाख रुपये किमतीच्या दीड ते दोन किलो केशरचे उत्पादन अपेक्षित आहे. सध्या तीन महिन्यात अर्धा किलो केशरचं उत्पादन देखील त्यांनी मिळवलं आहे. (Saffron Farming Grown by Hole Couple)

Saffron Farming Nagpur
केशरची शेती

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 6:55 PM IST

Updated : Nov 8, 2023, 10:40 PM IST

केशरच्या शेतीविषयी माहिती देताना होले दाम्पत्य

नागपूर Saffron Farming Nagpur :केवळ एकदाचं गुंतवणूक करून या दाम्पत्याला आता दरवर्षी किमान आठ ते दहा लाखांचा निव्वळ नफा हा पुढील पाच ते सात वर्षांसाठी निश्चित झालाय. कोण आहे हे प्रयोगशील दाम्पत्य आणि त्यांना केशर शेती फुलवण्याचा विचार कसा आला? सुरुवातीला किती रुपयांचं भांडवल त्यांनी घातलं? किती रुपयांचा नफा त्यांना अपेक्षित आहे? या सर्व बाबी आपण 'ईटीव्ही भारत'च्या विशेष बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

टबमध्ये उमललेली केशरची मनमोहक फुले

दिव्या आणि अक्षयने फुलवली केशर शेती :दिव्या आणि अक्षय होले असं या तरुण व प्रयोगशील दाम्पत्याचं नाव आहे. दिव्या बँकेत अधिकारी आहे तर अक्षय यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. दोघांना शेतकरी आणि शेतीच्या बाबतीत प्रचंड ओढ आहे. आई-वडील शेतकरी कुटुंबातील असल्यानं त्यांना कायम शेतीच्या क्षेत्रात काहीतरी नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची हौस होती. अशातचं त्यांना इंटरनेटवर केशर शेतीच्या प्रयोगाची माहिती समजली. त्यानंतर केशर शेतीच्या बाबतीत अधिकची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. केशरची शेती आपल्या घरात देखील करता येते, ही संकल्पना समजल्यानंतर दिव्या आणि अक्षयने थेट काश्मीरच्या पंपोर येथे जाऊन यासंदर्भात माहिती घेतली आणि सुरू झाला त्यांचा केशर शेतीचा प्रयोग.


विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ठरणार संजीवनी :विदर्भातील शेती व शेतकरी हे दोन्ही अडचणीत आहेत. विदर्भातील पिकांना कधी उष्ण वातावरणाचा फटका बसतो तर कधी अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांची नासाडी होते. त्यामुळे हवालदिल शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. शेतीला जोडधंदा म्हणून आजचे तरुण व होतकरू शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसत असले तरी अपेक्षित यश मिळतं नसल्यानं ते देखील हताश, निराश होऊ लागले आहेत. शेती आणि शेतकऱ्यांच्याबद्दल मनात तळमळ असलेल्या एका तरुण दाम्पत्यानं तब्बल दीड-दोन वर्ष अभ्यास करून चक्क चार बाय चारच्या एका बंद खोलीत 'केशर'ची शेती फुलवली आहे. महत्त्वाचं म्हणजे विदर्भातील वातावरण देखील अवघ्या पाच महिन्यांत केशर पीक लाखो रुपयांचा नफा शेतकऱ्यांना मिळवून देईल. त्यामुळे ही शेती प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे.


नागपूरच्या उष्ण वातावरणात केशर शेती :भारतात केशरचे उत्पादन हे उत्तरेकडील थंड राज्य असलेल्या जम्मू-काश्मीरमध्येचं होतं. केशरची शेती करण्यासाठी वातावरण फार थंड असावं लागतं. मात्र, आता 'ऑरेंज सिटी' अशी ओळख असलेल्या अतिउष्ण नागपुरात देखील केशर शेती शक्य झाली आहे. 'एरोपोनिक्स' तंत्रज्ञानाच्या मदतीनं बंद खोलीत केशर लागवडीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.


'एरोपोनिक्स' तंत्रज्ञान म्हणजे काय?गेल्या काही वर्षांमध्ये शेतीसाठी 'एरोपोनिक्स' तंत्रज्ञान विकसित झालं आहे. यामध्ये बंद खोलीत तापमानाला नियंत्रण करून शेती केली जाते. यामध्ये माती किंवा पाण्याचा उपयोग केला जात नाही. कमी वेळेत अगदी लाखोंचं उत्पादन मिळवून देणाऱ्या या नव्या आणि वेगळ्या प्रयोगाला 'एरोपोनिक्स' तंत्रज्ञान असं म्हणतात.


अशी केली जाते केशर शेती?अक्षय आणि दिव्या यांनी केशर शेती करण्याचं निश्चित केल्यानंतर त्यांनी काश्मीरच्या पंपोर जिल्ह्यातून केशर बियाणं आणलं. कांद्याच्या रोपाप्रमाणे दिसणारं केशरचं बियाणं वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकदा लागवड केल्यानंतर पुढील पाच ते सात वर्षे त्यापासून अनेक रोपं तयार होतात. दिव्या यांच्या माहितीनुसार देशाला दरवर्षी जेवढी केशरची गरज आहे, त्या तुलनेत केवळ २० टक्के उत्पादनचं आपल्या देशात घेतलं जातं. उर्वरित केशर हे बाहेरून मागवावं लागतं. मात्र, आता 'एरोपोनिक्स' तंत्रज्ञानाच्या मदतीनं घरातल्या घरातचं शंभर टक्के शुद्ध केशरची लागवड केली जाऊ शकते. ज्यातून लाखो रुपयांचा नफा शेतकऱ्यांना मिळू शकतो.


सुरुवाती गुंतवणूक नंतर नफाचं नफा :अक्षय आणि दिव्याने सुरुवातीला पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर ५ महिने योग्य ती काळजी घेतली की उत्पादनाला सुरुवात होते. होले दाम्पत्यानं आता उत्पादन स्वतःचं ब्रँडिंग करून विकण्याचा निर्धार केला आहे. केशर शेती करताना केवळ एकदा गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर नफाचं नफा मिळतो, असं ते म्हणाले.

हेही वाचा:

  1. Keshar Farming In Pune : पठ्ठ्यानं कर्करोगावर मात करत सुरू केली 'केशर'ची शेती, आता मिळवतोय लाखोंचं उत्पन्न!
  2. हिमालयाच्या कुशीतील 'केशर' शेतीची नवी ओळख
  3. Kesar Tea Benefits : केशर चहा प्यायल्यानं होतात 'हे' आरोग्य फायदे; पण बनवताना करू नका ही चूक...
Last Updated : Nov 8, 2023, 10:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details