नागपूर- व्यापारी ऋषी खोसला हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. ऋषीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी युथ फोर्सचे संस्थापक मिक्की बक्षी याला अटक केली आहे. यात कौटुंबिक वादातून ऋषीची हत्या झाल्याचे कारण देखील समोर आलेले आहे.
नागपुरात ऋषी खोसला हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश - ऋषी खोसला
व्यापारी ऋषी खोसला हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. ऋषीच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी युथ फोर्सचे संस्थापक मिक्की बक्षी याला अटक केली आहे.
![नागपुरात ऋषी खोसला हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4213516-thumbnail-3x2-nagpur.jpg)
शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री तिघांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. या तीन हत्यांपैकी व्यापारी असलेले ऋषी खोसला हत्या प्रकरण हाय-प्रोफाइल असल्याने या खुनाचा उलगडा तत्काळ करण्याचा पोलिसांवर दबाव होता. पोलिसांनी सर्व क्षमतेनिशी या प्रकरणाचा तपास करुन अवघ्या ४ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ऋषी खोसला हत्येप्रकरणी पोलिसांनी युथ फोर्सचे संस्थापक मिक्की बक्षी याला अटक केली आहे. हत्येमागील कारण हे कौटुंबिक वाद असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात पोलिसांनी कोणताही खुलासा केलेला नाही. मिक्की आणि ऋषी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैर होते. त्याचे रूपांतर हे ऋषीच्या हत्येत झाल्याचे बोलले जात असून पोलीस पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा खुलासा करणार असल्याचे सांगितले जात आहे.