महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांना ‘आरटीजीएस व एनईएफटी’ची सुविधा - RTGS facility

यापूर्वी मोठ्या रक्कमेचे वीजबिल प्रामुख्याने धनादेशाद्वारे भरण्यात येत असे. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे सध्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम झाला आहे. ही अडचण लक्षात घेऊन महावितरणने १० हजार रुपयांपेक्षा अधिकचे वीजबिल भरण्यासाठी ‘आरटीजीएस व एनईएफटी’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Electricity
वीज

By

Published : May 8, 2020, 11:45 AM IST

नागपूर -घरगुती ग्राहक आणि को-ऑपरेटिव्ह हाऊसींग सोसायट्यांना १० हजारांपेक्षा अधिक वीजबिल भरण्यासाठी महावितरणकडून ऑनलाईन वीजबिल भरण्याची सुविधा देण्यात आली होती. कोरोना लॉकडाऊनमुळे आता ‘आरटीजीएस व एनईएफटी’ची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यापूर्वी मोठ्या रक्कमेचे वीजबिल प्रामुख्याने धनादेशाद्वारे भरण्यात येत असे. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे सध्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम झाला आहे. ही अडचण लक्षात घेऊन महावितरणने १० हजार रुपयांपेक्षा अधिकचे वीजबिल भरण्यासाठी ‘आरटीजीएस व एनईएफटी’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच सिंगल किंवा थ्रीफेज घरगुती वीजग्राहकांनाही आता १० हजारांपेक्षा अधिक वीजबिलांची रक्कम या प्रणालीद्वारे भरता येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details