नागपूर -देशाच्या उत्तर-पूर्वेची राज्ये आपल्याकडे राहतील की नाही, याची भीती नेहमीच व्यक्त केली जाते. एवढेच नाही, तर एक दिवस आसामचे काश्मीर होईल, असेही काही लोक म्हणतात. मात्र, येथे काही लोकांनी त्यांचा धर्म बदलून ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. मात्र, ते आनंदाने संघाचा गणवेश घालून संघाच्या शाखा आणि कार्यक्रमांमध्ये सामील होतात, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले. एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
आसाममधील ख्रिश्चन समाजाचे लोक आनंदाने संघाच्या शाखेत येतात - मोहन भागवत - सरसंघचालक मोहन भागवत
उत्तर पूर्वेकडील लोक भारतासोबत एकात्म आहेत. आज अरुणाचल प्रदेशातील लोक चीनच्या सीमेवर उभे राहून भारतीय झेंडे दाखवतात आणि भारताचा जयघोष करतात.
उत्तर पूर्वेकडील लोक भारतासोबत एकात्म आहेत. आज अरुणाचल प्रदेशातील लोक चीनच्या सीमेवर उभे राहून भारतीय झेंडे दाखवतात आणि भारताचा जयघोष करतात. अरुणाचल प्रदेश हे शुद्ध भारतीय नाव आहे. पण जेव्हा अरुणाचलचे लोक दिल्लीला येतात, तेव्हा तेथील लोक त्यांना विचारतात की आपण चीनचे आहात काय? त्यांना हे ऐकून काय वाटत असेल? कारण दिल्लीतील सर्व लोक जागरूक आहेत, असा समज सर्वांमध्ये आहे. मात्र जे लोक आम्ही भारतीय आहोत, असे म्हणत चीनसोबत भांडतात त्यांना दिल्लीची लोकं चिनी समजतात. हे केवढे आज्ञानाचे लक्षण आहे, असेही भागवत म्हणाले.