नागपूर -कलम ३७० रद्द झाल्यानंतर आज (गुरुवारी) प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत या विषयावर बोलले. मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाची पाठराखण करताना ते म्हणाले, "मोदी है तो मुमकीन है" प्रधानमंत्री नरेंद्र मोदींबद्दल लोक म्हणत असलेले हे वाक्य बरोबर आहे, असे म्हणत भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठ थोपटली आहे. तसेच प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मोदींनी नागरिकांच्या इच्छेचा मान राखला असल्याचे भागवत म्हणाले.
संघप्रमुख मोहन भागवतांनी थोपटली मोदींची पाठ! म्हणाले 'मोदी है तो मुमकीन है' - मोदी है तो मुमकीन है संघप्रमुख मोहन भागवत
कलम ३७० रद्द झाल्यानंतर आज (गुरुवारी) प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत या विषयावर बोलले. मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाची पाठराखण त्यांनी केली.
नागपुरातील रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती मंदिरात स्वातंत्र्य दिन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघप्रमुख डॉक्टर मोहन भागवत यांनी स्मृती मंदिर परिसरात ध्वजारोहण केले. देशाची धुरा ज्यांच्या हाती आहे त्यांच्या संकल्पशक्तीसोबतच देशाच्या नागरिकांची इच्छाशक्ती देखील तेवढीच महत्वपूर्ण असल्याचे संघप्रमुखांनी यावेळी सांगितले.
काश्मीरचा उल्लेखही न करता संघप्रमुख म्हणाले की, देशातील स्वातंत्र्याचा अनुभव जसा इथे करता येतो, तसाच अनुभव देशातील प्रत्येक राज्यात करता यावा. यामुळे ही मागणी योग्य होती. तेथील नागरिकांना देखील देशातील इतर राज्याप्रमाणे जगता यावे व संविधानात सांगितलेली समानता प्रत्यक्षात यावी, ही आमची इच्छा होती. अशीच इच्छाशक्ती प्रबळ झाल्याने ते काम पूर्ण करण्याची शक्ती सत्ताधाऱ्यांना मिळाली. जनतेची इच्छाशक्ती व सत्ताधाऱ्यांची संकल्पशक्ती महत्त्वाची आहे. इंग्रजीतील एक वाक्यरचना आहे 'येस वी कॅन' याप्रमाणे आम्ही ते करून दाखवल्याचा विश्वास संघप्रमुख मोहन भागवत यांनी यावेळी व्यक्त केला.