नागपूर- शिवसेना मुख्यमंत्रिपदावर अडून बसल्याने, भाजपची कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्यात आली असल्याचे समजते.
राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना देशाची राजधानी दिल्ली आणि राज्याची राजधानी मुंबईत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना मुख्यमंत्रीपदाशिवाय मानायला तयार नसल्याने महायुती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी भाजपने खास रणणिती आखली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्तास्थापनेची कोंडी फोडण्याची जबाबदारी नितीन गडकरी यांच्याकडे सोपवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.