महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रोहित पवार यांनी घेतला विदर्भातील पुरणपोळीचा पाहुणचार; पुरणपोळी बनवण्याचाही केला प्रयत्न - रोहित पवार यांनी घेतला पुरणपोळीचा आस्वाद

प्रवीण यांचे वडील मुनिराज राजणे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खंदे समर्थक व एक निष्ठावान अनुभवी कार्यकर्ते आहेत. काटोल दौऱ्यावर असतांना त्यांच्या घरी रोहित यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयासोबत बसून आग्रहाने आणि आपुलकीने पुरणपोळ्या खाऊ घातल्या.

पुरणपोळी बनवण्याचाही केला प्रयत्न
पुरणपोळी बनवण्याचाही केला प्रयत्न

By

Published : May 11, 2022, 10:10 AM IST

नागपूर - आमदार रोहित पवार हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त (ता. 9) मे रोजी काटोलमध्ये विकासकामाच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी नागपूर दौऱ्यावर होते. दौऱ्यावर असताना अनिल देशमुखांच्या मतदारसंघातील सोनोली गावातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रवीण मुनिराज राजणे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी विदर्भातील अस्सल गोड पदार्थ आणि खास पाहुणचारासाठी असलेल्या पुरणपोळीचा आस्वाद घेतला. एवढेच नाही तर पुरणपोळी बनवण्याचाही प्रयत्न केल्याचे फोटो आमदार रोहित पवार यांनी सोशल माध्यमांवर शेअर केलेत.

विदर्भातील पुरणपोळीचा पाहुणचार
प्रवीण यांचे वडील मुनिराज राजणे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खंदे समर्थक व एक निष्ठावान अनुभवी कार्यकर्ते आहेत. काटोल दौऱ्यावर असतांना त्यांच्या घरी रोहित यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयासोबत बसून आग्रहाने आणि आपुलकीने पुरणपोळ्या खाऊ घातल्या. यावेळी एक वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या या अप्रतिम चवीच्या पुरणपोळ्या खाऊन मन तृप्त झाल्याची भावना आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून व्यक्त केली.
पुरणपोळी बनवण्याचाही केला प्रयत्न

ABOUT THE AUTHOR

...view details