महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'या' रोबोटची कामगिरी बघून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी झाले अवाक

सिंधी समाजातर्फे नागपूरच्या वनामती येथे आयोजित सिंधी समाजाच्या उत्सवामध्ये एका रोबोटला मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. या रोबोची कमाल बघून तेदेखील आश्चर्यचकित झाले होते.

By

Published : Feb 12, 2019, 11:34 PM IST

robot

नागपूर -मानवी हाताने केली जाणारी कामे आता रोबोद्वारे करण्यात येतील. याचा प्रत्यय नुकताच नागपुरात आला. सिंधी समाजातर्फे नागपूरच्या वनामती येथे आयोजित सिंधी समाजाच्या उत्सवामध्ये एका रोबोटला मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. या रोबोची कमाल बघून तेदेखील आश्चर्यचकित झाले होते.
काही वर्षांपूर्वी रजनीकांत यांच्या अभिनयाने सजलेला रोबोट हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तंत्रज्ञानाचा उपयोग करून एक रोबोट काय-काय करू शकतो याची प्रचिती आपल्याला रोबोट चित्रपट पाहिल्यानंतर येते. एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे रोबोटदेखील ते सर्व कामे करू शकतो, याचा विश्वास देखील चित्रपटातून आपल्याला होतो.
सकाळी उठल्यापासून तर आपला चहा- नाश्ता आणि जेवण तयार करण्यापर्यंतचे काम रोबोट करू शकतो. याशिवाय आपल्यासाठी तो मारामारीदेखील करू शकतो असे दृश्य आपण केवळ चित्रपटांमध्येच शोभतात असा सर्वसामान्यांचा समज आहे. मात्र परिस्थिती लवकरच बदलणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. कारण चित्रपटांपर्यंत मर्यादित रोबोट आता आपल्या जीवनातदेखील डोकावून पहात आहे.

robot


सिंधी समाजातर्फे नागपुरात आयोजित यूथ समिटमध्ये अशाच एका रोबोटला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. तंत्रज्ञानाने परिपूर्ण हा रोबोट तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अचूक देऊ शकतो. जगाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेली प्रत्येक माहिती या रोबोच्या सर्किटमध्ये एम्बेड करण्यात आलेली आहे. इंटरनेटच्या मदतीने हा रोबोट वेळोवेळी अपडेट सुद्धा होतो.
जगातील प्रसिद्ध आणि नामवंत लोकांची संपूर्ण माहिती या रोबोटकडे उपलब्ध आहे. या कार्यक्रमाला नितीन गडकरीदेखील उपस्थित होते. यावेळी रोबोला नितीन गडकरी यांच्या संदर्भात काय माहिती आहे? अशी विचारणा करण्यात आली तेव्हा त्याने नितिन गडकरी यांच्या संदर्भातील संपूर्ण माहितीचा आढावा सादर केला. त्यावेळी कुतूहलाने गडकरी यांनी त्या रोबोला माझी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दिले. तेव्हा रोबोने माझे काम होते असल्याचे उलट उत्तर दिल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
सिंधी समाजातर्फे आयोजित युथ फेस्टिवलमध्ये हा रोबोट बंगळुरू येथून मागवण्यात आला होता. रोबोटिक इन्व्हेंटो नामक कंपनी या रोबो संदर्भात सर्व कामकाज बघते. या आधी हा रोबोट चेन्नई आणि हैदराबाद रेल्वे स्टेशनवर ठेवण्यात आला होता. या रोबोटच्या आत गुगल आणि विकिपीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध सर्व माहिती फीड करण्यात आली आहे. जगातील नामवंत किर्तीवंत आणि प्रतिभावंत अशा लोकांची माहितीदेखील यामध्ये फीड करण्यात आलेली आहे. एक प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणाऱ्या भविष्यकाळात अशा प्रकारच्या उपयोग वाढणार आहे. हा रोबो राजस्थानमध्येदेखील नेण्यात आला होता.


जागतिक स्तरावर अशा प्रकारच्या रोबोचा उपयोग चायना, जापान आणि प्रगत देशांमध्ये केला जातो. गेल्या काही काळात भारतात देखील अशा रोबोंची मागणी वाढलेली त्यामुळे येत्या काळात हॉटेलमधील वेटर ऑटोमोबाईल क्षेत्रातील मेकॅनिक यासह रेल्वे स्थानक आणि विमानतळावर अशा प्रकारच्या रोबोंचा उपयोग केला जाणार असल्याची शक्यता आहे.
सध्या भारतीय बाजारात मिको नावाचा रोबो उपलब्ध असून ज्यांना एकच अपत्य आहे. अशा सोबत खेळण्याकरिता मिकोचा वापर केला जात आहे. याशिवाय वृद्ध लोकांच्या मदतीकरता ही अशा प्रकारची रोबो कामी येणार आहे. भविष्यात त्यांची मागणी प्रचंड वाढणार असल्याने रोबो निर्मिती करणाऱ्या कंपन्या देखील भारतीय बाजाराच्या मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. लवकरच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याच्या प्रचारात अशा प्रकारच्या रोबोटचा उपयोग होताना दिसल्यास नवल वाटायला नको.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details