महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीसांकडून नागपुरातील कोरोना व म्युकर मायकोसिस स्थितीचा आढावा

कोरोना विषाणूच्या तिसर्‍या लाटेची शक्यता विचारात घेता नागपुरात लहान बालकांसाठी 200 खाटांचे सुसज्ज रुग्णलय तयार ठेवावे, अशी सूचना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला केली.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

By

Published : May 25, 2021, 7:25 PM IST

नागपूर -कोरोना विषाणूच्या तिसर्‍या लाटेची शक्यता विचारात घेता नागपुरात लहान बालकांसाठी 200 खाटांचे सुसज्ज रुग्णलय तयार ठेवावे, अशी सूचना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला केली. यासोबत यासाठी आवश्यक ती सर्व मदत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटतर्फे करण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. याशिवाय, म्युकरमायकोसिसच्या स्थितीचा सुद्धा त्यांनी या बैठकीतून आढावा घेतला.

देवेंद्र फडणवीस यांनी आज एक बैठक नागपूर महापालिकेचे अधिकारी, महापौर आणि अन्य लोकप्रतिनिधींसोबत नागपूर महापालिकेत घेतली. महापालिका आयुक्त, महापौर दयाशंकर तिवारी, आ. प्रवीण दटके, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, सत्ता पक्षनेते अविनाश ठाकरे आणि इतरही यावेळी उपस्थित होते.

वयोगटानुसार गरजा तपासून नियोजन करावे -

संभाव्य तिसर्‍या लाटेची शक्यता विचारात घेता काय उपाययोजना केल्या जात आहेत. आगामी परिस्थितीचा अंदाज पाहता आणखी काय करता येईल, याबाबत सुद्धा सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. पूर्वतयारीचा एक भाग म्हणून मनपाकडून लहान मुलांसाठी 200 खाटांचे एक रूग्णालय तातडीने उभारण्यात यावे, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि यासाठी लागणारी सर्व ती मदत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या वतीने करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. लहान मुलांसाठी रुग्णालय उभारताना विविध वयोगट विचारात घ्यावा. अगदी लहान बालके असल्यास त्यांच्या पालकांची व्यवस्था सुद्धा करावी लागेल. प्रत्येक वयोगटाच्या विविध गरजा लक्षात घेऊन याची रचना करावे लागेल, असे सांगताना त्यांनी अनेक उपयुक्त सूचना केल्या.

म्युकरच्या रुग्णाचे स्क्रीनिग करून उपचार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करा -

म्युकरमायकोसिस रुग्णांची नागपुरातील स्थिती, संभाव्य तिसरी लाट विचारात याचा विचार करू उपाययोजना बाबत सविस्तर चर्चा या बैठकीत झाली. म्युकर मायकोसिसच्या रूग्णांचे स्क्रिनिंग लवकर व्हावे, म्हणजे वेळेत उपचार केल्यास दिलासा मिळेल अशाही सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली. कॉल सेंटरची स्थापना करून स्क्रिनिंगची आणि वेळेत उपचारांची योग्य स्ट्रॅटजी तयार करण्यात यावी, अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला. पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देत यासाठी ऑपरेशन थिएटर्सची संख्या वाढविण्याचा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला.

दरम्यान, यापूर्व नागपूर जिल्हा परिषदेतील भाजपा सदस्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट घेऊन ग्रामीण भागातील कोरोना स्थिती आणि इतरही विविध विषयांवर चर्चा केली. आ. समीर मेघे, टेकचंद सावरकर आणि इतर यावेळी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details