महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर जिल्ह्यातील निर्बंध कायम, गर्दी न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन - नागपूर जिल्हा न्यूज अपडेट

राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट, ऑक्सिजन बेडची उपलब्धता व दैनंदिन रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता सुधारीत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. जिल्हा जरी पहिल्या श्रेणीमध्ये समाविष्ट असला तरी जुने निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी कायम ठेवले आहेत. कोरोना अद्याप संपला नसून, नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

नागपूर जिल्ह्यातील निर्बंध कायम
नागपूर जिल्ह्यातील निर्बंध कायम

By

Published : Jun 12, 2021, 9:16 PM IST

नागपूर -राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट, ऑक्सिजन बेडची उपलब्धता व दैनंदिन रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता सुधारीत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. जिल्हा जरी पहिल्या श्रेणीमध्ये समाविष्ट असला तरी जुने निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी कायम ठेवले आहेत. कोरोना अद्याप संपला नसून, नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात लागू असलेल्या बाबींना 14 जूनपासून सकाळी 7 वाजेपासून ते पुढील आदेशापर्यत मुभा देण्यात येत आहे. यामध्ये आधार कार्ड सेंटर (सायंकाळी 5 वाजेपर्यत), टायपिंग इन्स्टिटयुट, कॉप्युटर इन्स्टिटयुट आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य विकास इन्स्टिटयुट (एकावेळी 20 विदयार्थी किंवा क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी उपस्थितीत देता येणारे प्रशिक्षण) शॉपिंग मॉलमधील रेस्टॉरंट आणि बार यांना 50 टक्के क्षमतेने रात्री 10 पर्यत मुभा देण्यात आली आहे. हे आदेश सोमवारी 14 जून सकाळी 7 वाजेपासून ते 21 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहातील. वरील बाबी वगळता जिल्हा प्रशासनाने यापूर्वी 6 जून रोजी काढलेल्या आदेशातील निर्बंध कायम ठेवले आहेत.

काय राहणार सुरू?

१. अत्याआवश्यक वस्तुंच्या दुकानांची, आस्थापनांची वेळ पाच वाजेपर्यंत राहील.
२. आवश्यक नसलेल्या वस्तुंच्या दुकानांची, आस्थापनांची वेळ पाच वाजेपर्यंत राहील.
३. शहरातील मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने पाच वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.

४. उपाहारगृहे 50 टक्के क्षमतेत रात्री दहापर्यंत सुरू ठेवता येतील.
५. लोकल ट्रेन, मेट्रो नियमित सुरू राहतील.
६. सार्वजनिक ठिकाणे आणि पटांगणावर वाकिंग, सायकलिंगसाठी सकाळी पाच ते नऊ व सायंकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत परवानगी असेल.

७.खासगी कार्यालय सायंकाळी पाचपर्यंत सुरू ठेवता येतील.
८. सामाजिक, सांस्कृतिक, कार्यक्रमांसाठी हॉलच्या पन्नास टक्के उपस्थितीला परवानगी, मात्र ही क्षमता १०० व्यक्ती पर्यंत मर्यादित.
९. लग्न समारंभ मंगल कार्यालयाच्या 50% उपस्थिती क्षमतेत करता येईल. मात्र ही पन्नास टक्के उपस्थिती कोणत्याही परिस्थितीत शंभर लोकांपेक्षा अधिक असता कामा नये.
१०.अंत्यसंस्कारासाठी अधिकाधिक 50 लोकांना उपस्थित राहता येईल.
११.बैठका, निवडणुका, स्थानिक प्रशासन व स्थायी समिती बैठक ऑनलाईन घेता येतील.
१२.बांधकाम करण्यास परवानगी आहे.
१३. शेतीच्या सर्व कामांना सायंकाळी पाच वाजेपर्यंत परवानगी.
१४. ई-कॉमर्स साहित्य व सेवा पुरवठा नियमित
१५.जिम, सलून, सौंदर्य केंद्र, स्पा, वेलनेस केंद्र पाच वाजेपर्यंत सुरू राहतील.
१६. सार्वजनिक वाहतूक मालवाहतुकीला परवानगी असेल, बसमध्ये उभे राहून प्रवासास निर्बध.
१७. आंतरजिल्हा प्रवास, खासगी कार, टॅक्सी, बस, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरू असतील, मात्र ज्या जिल्हयात ई - पास आवश्यक असेल तिथे स्थानिक नियम पाळावे.
१८. उत्पादन निर्यात करणाऱ्या कंपन्यांची माल निर्यात नियमित पणे सुरू असेल.
१९. शाळा कॉलेजेस सर्व बंद असतील
२०.सर्व धार्मिक स्थळे बंद असतील
२१. सर्व जलतरण तलाव बंद असतील

हेही वाचा -भाजपकडून ओबीसींचा घात; नाना पटोले यांचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details