महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Republic Day : 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा - प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिना निमित्त नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर ध्वजारोहण व पथसंचलनाचा जिल्हास्तरीय मुख्य शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. प्रजासत्ताक दिन सोहळ्यात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Republic Day
प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

By

Published : Jan 26, 2023, 6:51 PM IST

नागपूर :ध्वज वंदनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परेडचे निरीक्षण केलं. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या पथसंचलनाचे नेतृत्व सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश बिरादार यांनी केले, तर दुय्यम कमांडर राखीव पोलिस उपनिरीक्षक संतोष गिरी होते. पथसंचलनात एकूण 23 पथके सहभागी झाले होते. यामध्ये राज्य राखीव पोलिस बल गट क्र. 4, नागपूर शहर पोलिस सशस्त्र पथक, नागपूर ग्रामीण पोलिस सशस्त्र पथक, नागपूर लोहमार्ग पोलिस सशस्त्र पथक, नागपूर शहर वाहतूक पोलिस,नागपूर शहर महिला पोलिस, गृहरक्षक दल महिला (होमगार्ड), गृहरक्षक दल पुरुष (होमगार्ड), प्रहार डिफेन्स अकॅडेमी खामला, भोसला सैनिकी शाळा, प्रहार सैनिकी शाळा, राजेंद्र हायस्कूल, सेंट ऊर्सूला शाळा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा चित्ररथ आदी पथके सहभागी झाले होते.

जवानांचा गौरव : प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात शहीद जवानांच्या वारसांना आणि अपंगत्व आलेल्या जवानांचा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॅा. शिल्पा खरपकर यांना ध्वजदिन निधी संकल्नात 170 टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आला.

पुणे : भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पोलीस परेड मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. कार्यक्रमास विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिचंवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त रितेश कुमार, विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव :राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेले गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सुधाकर काटे आणि पुणे शहराचे सहायक पोलीस उपनिरीक्षक धनंजय बारभाई तसेच केंद्रीय गृहमंत्री पदक प्राप्त पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सुरेशकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमानंतर पालकमंत्री शपाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यसैनिक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

अधिकारांचा उपयोग करावा :पालकमंत्री पाटील यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या भाषणात जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. लोकशाही बळकट करण्यासाठी भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. पालकमंत्री म्हणाले, भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान न्याय, बंधुता आणि सर्वांना समान मूल्य देणारी समता दिली. अनेक देशांना मताचा अधिकार मिळण्यासाठी विशेषतः गरीब, महिलांना संघर्ष करावा लागला. भारतीय राज्यघटनेने मात्र पहिल्या दिवसापासूनच सर्वांना समान मताचा अधिकार दिला. त्यातून सर्वसामान्य माणूस त्याच्या कर्तृत्वाच्या बळावर उच्च पदावर पोहोचू शकतो. नागरिकांनी अधिकारासोबतच कर्तव्य पालनाबाबत सजगता दाखवावी असे आवाहन त्यांनी केले.

मतदार नोंदणीसाठी पुढे यावे - यावेळी पालकमंत्री पाटील यांनी पद्मभूषण पूरस्कार जाहीर झालेले शास्त्रज्ञ डॉ. दीपक धर यांच्यासह राज्यातील पद्म पुरस्कार विजेते, राष्ट्रपती पोलीस पदक विजेते पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांचे आपल्या मनोगतात अभिनंदन केले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना मतदार नोंदनीसाठी केलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल भारत निवडणूक आयोगाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

राष्ट्रध्वजास मानवंदना :यावेळी पोलीस दलाने शानदार संचलन करून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २, पुणे शहर पोलीस दलाचे पुरुष पोलीस, महिला पोलीस, पिंपरी चिंचवड पोलीस, लोहमार्ग पोलीस, गृहरक्षक दल, वाहतूक पोलीस, वन, अग्निशामक दल तसेच इमॅन्युएल मार्थोमा स्कूल, भारती विद्याभवन स्कूल या शाळांच्या मुले व मुलींच्या पथकांनी शिस्तबद्ध संचलन केले. तसेच पोलीस वाद्यवृंद, श्वानपथक, वज्र वाहन, जलद प्रतिसाद दल वाहन, वरुण वाहन, अग्निशामक वाहन, रुग्णवाहिका, बालभारतीचा चित्ररथ, महानगरपालिकेची स्वच्छ्ता वाहने यांनीही संचलनात सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधले. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची सांगता झाली .

जालना :नवीन सरकार हे विकासच जनतेच सरकार आहे - पालकमंत्री अतुल सावे
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आज जालना येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर करण्यात आला आहे. मुख्य ध्वजारोहण राज्याचे सहकार, मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की,बदनापूर येथे अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले. त्याचा आढावा जिल्हाधिकारी यांच्याकडून घेऊन येणाऱ्या सोमवारी मुंबई येथे बैठक आहे. या बैठकीत नुकसान भरपाईची आढावा घेऊन त्यावर कारवाई करणार असल्याचे अतुल सावे यांनी सांगितले.

जनतेचं सरकार :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व अजित पवार यांनी घेतलेला शपथविधी शरद पवारांची खेळी आहे. असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केलेलं आहे त्याबद्दल विचारले असता सावे यांनी त्या वक्तव्यावर झालेल्या जुन्या गोष्टीवर काहीही बोलणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे विकासच जनतेचं सरकार आहे असे यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

बुलढाणा :जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आज शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. एच. पि. तुम्मोड यांच्या हस्ते पोलिस कवायत मैदान येथे संपन्न झाले. त्यानंतर पथ संचालन करण्यात आले असून या संचलनात विविध विभागाचे चित्ररथ सहभागी झाले होते. तसेच जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्याबद्दल अनेकाचां गौरव सुद्धा करण्यात आला.


प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा : आज शाळा,कॉलेज व प्रशासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा झाला. येथील पोलीस कवायत मैदानावर जिल्हाधिकारी एचपी तूम्मोड यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरवी सावंत, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक शामला खोत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी, पोलिस उपअधीक्षक गिरीश ताथोड यांच्यासह विरमाता, विरपिता, विविध विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. राष्ट्रध्वज वंदनानंतर डॉ. तुम्मोड यांनी परेड निरीक्षण केले. त्यानंतर कृषि विभाग,उपप्रादेशिक परिवहन विभाग,नगर विकास शाखा, सामाजिक वनीकरण विभाग, निवडणूक विभाग यांच्या चित्ररथाने मार्गक्रमण केले.

वीरमातेला ताम्रपट :सॅन्डो बटालियनमध्ये कार्यरत असताना शहिद झालेले कैलास पवार यांच्या विरमाता उज्ज्वला भारत पवार यांना ताम्रपट देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस दलातील पंकज सपकाळे, मोहम्मद शफीक अब्दुल रहिम, केशव नागरे, गजानन नाटेकर, शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त श्रीनिल बेलोकार, अदिती राणे, हर्ष कुंभारे, आदिनाथ इंगळे, वृंदा राठी, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. रवी शिंदे, डॉ. यास्मिन चौधरी, एस. जी. सोळंकी, कैलास बेंडवाल, आयुष्मान भारतच्या डॉ. रिया चोपडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे अविनाश महाले, फुल सिंह, धीर वाकोडे, पराग गवई, जिल्हाधिकारी कार्यालयाचे श्रीकांत हाके यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

बीड : भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करून संपन्न झाला. यावेळी कार्यालयातील सर्वच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर बीड पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली.

हेही वाचा -Sneha Kokane Criticized Dr Kayande : याला नंगानाच म्हणत नाही,बॉडी बिल्डर स्नेहा कोकणेंनी कायंदेंना सुनावले

ABOUT THE AUTHOR

...view details