नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयात आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. सरसंघचालक मोहन भागवत आणि सहकार्यवाह भय्याजी जोशी प्रवासात असल्याने महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी संघमुख्यालयातील पोलीस कर्मचारी आणि संघ स्वयंसेवक उपस्थित होते.
संघ मुख्यालयात महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातही प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. अत्यंत साध्या पद्धतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ज्येष्ठ स्वयंसेवक, प्रचारकही उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सजावट
देशभरात आज 72 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सकाळीच ट्विट करुन देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, अखंड वारकरी संप्रदायाचे दैवत असणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तिरंगी रंगांमध्ये फुलांची आरास करण्यात आली आहे. झेंडू, शेवंती, स्प्रिंगर, कार्नेशियन अशा विविध फुलांचा यात वापर करण्यात आला. या सजावटीत 146 किलो फुलांचा वापर करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने केलेली ही मनमोहक सजावट विठ्ठल भक्तांसाठी अनोखी भेट ठरली आहे.
हेही वाचा -संविधान वाचनाचे कार्यक्रम नियमित आयोजित होणे गरजेचे- खोब्रागडे
हेही वाचा -'अवनी'ला ठार मारणाऱ्या पथकाने एनटीसीए सूचनांचे पालन केलेच नाही