नागपूर- भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या नावापुढे 'रिजेक्ट'चा शिका मारल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील काँग्रेस नगर येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमधील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर उमेदवारांचे नाव आणि चिन्ह असलेली यादी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामध्ये गडकरींच्या नावापुढे रिजेक्टचा शिक्का मारण्यात आल्याचे दिसून आले.
नागपुरात गडकरींच्या नावापुढे रिजेक्टचा शिक्का, नव्या वादाला फुटले तोंड - नितीन गडकरी
मतदान केंद्राबाहेरील उमेदवारांच्या यादीत गडकरींच्या नावापुढे रिजेक्टचा शिक्का.... नागपुरातील न्यु इंग्लिश स्कुल मतदान केंद्रातील प्रकाराने निर्माण झाला नवा वाद... या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणताही खुलासा नाही.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज सुरू आहे. त्याकरीता प्रशासनाने सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. निवडणूक निष्पक्ष पणे पार पडावी, याकरिता प्रशासनातर्फे काही बाबींची खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र, एवढे करूनदेखील काँग्रेस नगरातील न्यू इंग्लिश हायस्कूल येथील मतदान केंद्राबाहेर लावण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीवरून वाद निर्माण झाला आहे.
येथील उमेदवारांच्या यादीत नितीन गडकरी यांच्या नावापुढे रिजेक्ट, असा स्टॅम्प मारण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. गडकरींच्या नावासमोर रिजेक्टचा शिक्का कुणी आणि का मारला यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.