ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जातीय समीकरणांना फाटा देत नितीन गडकरींनी राखला गड, 'ही' आहेत विजयाची कारणे - नागपूर

नागपूरच्या रिंगणात नितीन गडकरी, काँग्रेसकडून नाना पटोले रिंगणात होते. तर वंचित आघाडीकडून सागर डबरासे आणि बीएसपीने मोहम्मद जमाल यांना मैदानात उतरवले होते. त्यामुळे नागपूरांसमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले होते. मात्र, नागपूरकरांनी जाती धर्माच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिले. त्यामुळे जातीय समीकरणे फोल ठरले आहेत.

पराभूत झालेले उमेदवार नाना पटोल आणि विजयी उमेदवार नितीन गडकरी
author img

By

Published : May 24, 2019, 6:39 PM IST

नागपूर - नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरींना विजय मिळवणे कठीण जाईल, असे बोलले जात होते. मात्र, गडकरींनी जातीय समीकरणांना फाटा देत काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना २ लाख १६ हजार ९ मतांनी पराभूत केले आहे. गडकरींनी नागपूरचा केलेला कायापालट त्यांच्या विजयासाठी महत्त्वाचा ठरलेला आहे. नागपूरकरांनी जातीचा विचार न करता फक्त गडकरींनी केलेल्या विकासकामांना मत दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघात निकालानंतर काय झालं याबाबत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा

नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष लागले होते. गडकरींचा विजयरथ जातीय समीकरणे रोखून धरतील, अशा शंका-कुशंका निर्माण झाल्या होत्या. याशिवाय मोदी सरकारला अपेक्षित यश न मिळाल्यास पंतप्रधानपदासाठी तडजोडीचा उपाय म्हणून नितीन गडकरी नावाचा पर्याय उपलब्ध असल्याचे बोलले जात होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निकालातून केंद्रातील सर्व शंका-कुशंकांवर विराम लावत गडकरींनी आपला गड राखला आहे.

२०१४ च्या निवडणुकीत नितीन गडकरींनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि ७ वेळा खासदार राहिलेले विलास मुत्तेमवार यांच्यावर विजय मिळवला होता. गडकरींनी ५ वर्षात केलेले विकास कामे दिसत असल्याने त्यांच्या विजयबद्दल गडकरी फारसे चिंतीत नव्हते. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोलेंनी त्यांच्याविरोधात आक्रमक प्रचार केला होता. त्यामुळे गडकरी त्यांच्या विजयाबाबद निश्चित नव्हते.

जातीय समीकरणसुद्धा गडकरींच्या बाजूनेच

नागपूर लोकसभा निडणूक ही राजकीय दृष्टीने भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली होती. नागपूरला संघभूमी तसेच दीक्षाभूमी म्हणून ओळखतात. मात्र, जाती, धर्म आणि पंथाच्या राजकारणाला नागपूरकर कधीही बळी पडला नाही. नागपुरात दलित आणि मुस्लिम मतांचा आकडा मोठा आहे. तसेच ओबीसी मतेही अधिक आहेत. त्यामुळे याठिकाणी जातीय समीकरणाला तेवढच महत्व होते. नागपूरच्या रिंगणात नितीन गडकरी, काँग्रेसकडून नाना पटोले रिंगणात होते. तर वंचित आघाडीकडून सागर डबरासे आणि बीएसपीने मोहम्मद जमाल यांना मैदानात उतरवले होते. त्यामुळे नागपूरांसमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले होते. मात्र, नागपूरकरांनी जाती धर्माच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिले. त्यामुळे जातीय समीकरणे फोल ठरले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांची विधानसभेत पुनरावृत्ती?
नागपूर लोकसभा मतदार संघात शहरातील ६ विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. या सहाही विधानसभा भाजपच्या ताब्यात आहेत. शिवाय महापालिका, जिल्हापरिषद, पंचायत समितीदेखील भाजपच्याच ताब्यात आहे. एवढेच नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नागपूरचेच भूमिपुत्र आहेत. त्यामुळे नागपूरकर भाजपच्या दिशेने वळलेले पाहायला मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा जोश संचारला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका एकतर्फी जिंकू, असा विश्वासही भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details