महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अर्थसंकल्पावर नागपुरातील सीए, अकाउंटंस यांच्या 'या' आहेत प्रतिक्रिया - NAGPUR

केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ५ वर्षातील कार्यकाळाची फलश्रुती असल्याचे, मत नागपुरातील तरुण चार्टर्ड अकाउंटंट तरुणांनी व्यक्त केले आहे.

तरुण चार्टर्ड अकाउंटंट

By

Published : Feb 1, 2019, 8:24 PM IST

Updated : Feb 4, 2019, 6:09 PM IST

नागपूर - आज मोदी सरकारने अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर केला. हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर करताना अक्षरशः घोषणांचा पाऊस पाडला. त्यामुळे सर्वसामान्य वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे. ठोस सवलतींच्या घोषणांमुळे सर्वसामान्य जनतेला या बजेटमधून काय मिळाले, याचे विश्लेषण नागपुरातील सीए, अकाउंटंस यांनी केले आहेत.

तरुण चार्टर्ड अकाउंटंट
केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ५ वर्षातील कार्यकाळाची फलश्रुती असल्याचे, मत नागपुरातील तरुण चार्टर्ड अकाउंटंट तरुणांनी व्यक्त केले आहे. देशाला मोदी सरकारकडून प्रचंड अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आजचा अर्थसंकल्प असल्याचे, मत त्यांनी व्यक्त केले. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला केंद्रस्थानी मानून पियुष गोयल यांनी घोषणांचा पाऊस पडला. मात्र, या घोषणा अस्तित्वात आणि पूर्णत्वास केव्हा येतील. याबाबत मात्र, नागपुरातील अकाउंटंट साशंक आहेत.

Last Updated : Feb 4, 2019, 6:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details