नागपूर -पदवीधर निवडणुकीमध्ये यावेळी बदल घडेल, असे कुणालाही वाटले नव्हते. मात्र, काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी अशक्यप्राय असा विजय खेचून आणलेला आहे. हा विजय महाविकास आघाडीसह कॉंग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ असल्याची प्रतिक्रिया अभिजीत वंजारी यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.
अभिजीत वंजारी यांच्या विजयानंतर कुटुंबियांची प्रतिक्रिया, म्हणाले.. - nagpur abhijeet vanjari news
काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी अशक्यप्राय असा विजय खेचून आणलेला आहे. या विजयावर अभिजीत वंजारी यांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे.
डॉ. स्मिता वंजारी या विद्यापीठाच्या राजकारणात सक्रिय आहेत, तर अभिजित वंजारी हे देखील गेल्या अनेक वर्षांपासून सिनेट सदस्य आहेत. पदवीधरांच्या प्रश्नांची त्यांना जाण असल्यानेच या निवडणुकीच्या प्रचारात नेमक्या मुद्यांना त्यांनी हात घातला. ज्याचा फायदा त्यांना निकालात झाला आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे. या विजयाचे भागीदार महाविकास आघाडी सुद्धा असल्याचे त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता वंजारी यांनी दिली आहे. तसेच माझे बाबा हे जनसामान्यांचे नेते आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी आजवर केलेली मेहनत आज फळाला असल्याची भावना देविका वंजारी हीने व्यक्त केली आहे.
हेही वाचा - कंगना रणौतला कायदेशीर नोटीस, अभद्र ट्विटवर माफी मागण्याची शीख संस्थेने केली मागणी