महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरातील गंगा जमूना भागात मदतीचा ओघ; वारांगणांना अन्न धान्याचे वाटप - ganga jamuna prostitute ration

वरांगणांच्या मदतीला विविध संघटना धावून आल्या आहेत. आज आर. संदेश फाऊंडेशन आणि आरएसएसने पोलिसांच्या मदतीने वरांगणांना अन्न धान्याचे वाटप केले आहे.

ration kit ganga jamuna
नागपुरातील गंगा जमूना भागात मदतीचा ओघ, वारांगणांना अन्न धान्याचे वाटप

By

Published : May 3, 2020, 4:53 PM IST

नागपूर- लॉकडाऊनमुळे शहरातील रेड लाइट म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या गंगा-जमुना भागातील वारांगणांचा व्यवसाय बंद झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या वरांगणांच्या मदतीला विविध संघटना धावून आल्या आहेत. आज आर. संदेश फाऊंडेशन आणि आरएसएसने पोलिसांच्या मदतीने वरांगणांना अन्न धान्याचे वाटप केले आहे.

नागपुरातील गंगा जमूना भागात मदतीचा ओघ, वारांगणांना अन्न धान्याचे वाटप

संस्थेचे कार्यकर्ते व लकडगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांच्या मदतीने ३०० वरागणांना अन्न धान्याचे साहित्य पुरवण्यात आले आहे. पुढील ८ दिवस पुरतील इतके अन्नधान्य आणि इतर साहित्याचे वाटपात करण्यात आले आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले आहे.

हेही वाचा-रानडुक्कराला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस वाहनाला अपघात, पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details