नागपूर- कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून रुग्णालयातून त्यांना सोडण्यात आले आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने पुढील 5 दिवस त्यांना गृह अलगीकरणात राहण्यास सांगितले आहे. गेल्या ९ एप्रिलला त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
सरसंघचालक मोहन भागवतांना कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज, विलगीकरणात राहण्याच्या सूचना - मोहन भागवतांना डिस्चार्ज
उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने पुढील 5 दिवस त्यांना गृह अलगीकरणात राहण्यास सांगितले आहे. गेल्या ९ एप्रिलला त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
![सरसंघचालक मोहन भागवतांना कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज, विलगीकरणात राहण्याच्या सूचना](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11426830-844-11426830-1618574222727.jpg)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना गेल्या ९ एप्रिलला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नागपूरातील किंग्जवे या खासगी रुग्णलायत दाखल करण्यात आले होते. आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना दाखल करण्यात आले होते.
Last Updated : Apr 16, 2021, 6:23 PM IST