नागपूर - रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणाचे हिवाळी अधिवेशनात पडसाद उमटले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्यावर मेहेरबानी का दाखवली जात आहे अशा आशयाचा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, आमदार आशिष देशमुख, खासदार संजय काकडे, नाथाभाऊ खडसे यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना, रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्याचे फोन टॅपिंग केले होते. राज्यातील बड्या नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणी सीआरपीएफच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुणे पोलिसांकडून देण्यात आलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाचा हा निर्णय शिंदे -फडणवीस सरकारला धक्का मानण्यात येत आहे.
यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यातील बड्या नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. पुणे पोलिसांनी न्यायालयामध्ये त्यांचा क्लोजर रिपोर्ट फेटाळला आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरु झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप करण्यात आले होते. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर यांचा तपास पोलिसांनी बंद करण्यासाठी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.
शिंदे -फडणवीस सरकारला धक्का -शिंदे-फडणवीस सरकारने रश्मी शुक्ला यांचा तपास बंद करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी तपास पोलिसांनी बंद करण्यासाठी क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. मात्र पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाचा हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारला धक्का असल्याचं बोललं जात आहे.