नागपूर : नागपूरसह विदर्भात पाच वर्षांखालील लहान मुलांच्या संपूर्ण शरीरावर काजण्यासदृश्य पुरळ येण्याचा आजार ( Rash in children under five years of age ) वाढतो आहे. १०० पैकी २५ ते ३० लहान मुलांमध्ये या आजाराचे लक्षण दिसत असल्याने पालकांसह बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. मुलांच्या तळहातावर, तळपायावर,पाठीवर,पोटावर, तोंडाच्या आतील भागात ही पुरळ येत आहेत, त्यामुळे या आजरचे गांभीर्या वाढले आहे.
परतीच्या पावसाचा लपंडाव :परतीच्या पावसाचा लपंडाव सुरू असल्याने नागपुरात साथीचे आजार वाढू लागले ( Rash Disease in Nagpur ) आहेत. मध्यंतरी विदर्भात स्क्रब टायफसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते ( Increase in number of scrub typhus patients ) आहे. मात्र तो आजार नियंत्रणात येताच आता लहान मुलांच्या संपूर्ण शरीरावर काजण्या सदृश्य पुरळ येत असल्याचे दिसत आहे. या आजाराची गंभीरता वाढली आहे. मात्र, या संदर्भात आरोग्य विभागाकडे अद्याप तरी या संदर्भात फारसी माहिती उपलब्ध नाही.