नागपूर -शहरातील जरीपटका आणि कपिल नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. पहिली घटना ही नात्याला काळिमा फासणारी आहे. ६२ वर्षीय आजोबांनी १३ वर्षीय नातीवर अत्याचार केल्याची तक्रार मुलीच्या आईने दाखल केली आहे. दुसऱ्या घटनेत २४ वर्षीय तरुणाने १२ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही गुन्हातील आरोपींना अटक केली आहे.
घराशेजारी राहणाऱ्या मुलीवर अत्याचार - पहिली घटना ही जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आरोपी निलेश लिंबाडे नामक आरोपीने घराच्या शेजारी राहणाऱ्या 12 वर्षीय मुलीसोबत मैत्री केली. आरोपी निलेशने हळूहळू पीडित मुलीला विविध प्रकारचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली केली. दोन दिवसांपूर्वी आरोपीने पीडित मुलीला घरी बोलावले होते. घर कुणीही नसल्याच्या संधीचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. घटनेची वाच्यता कुठे केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र, मुलीचे आईवडील घरी येताच तिने सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आई वडिलांनी जरीपटका पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी निलेशला अटक केली आहे.