नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले की, "आरोपी व्यक्ती ऑक्टोबर 2022 पासून पहिल्या लग्नापासून त्याच्या 32 वर्षीय लिव्ह-इन पार्टनर आणि तिच्या मुलीसोबत राहत होता. महिला पार्टनर बाहेर गेली की, तो तिच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करायचा. मागील 1 वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. आरोपीने पीडितेला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली होती. भीतीपोटी तिने सुरुवातीला कोणालाही सांगितले नाही.
पोक्सोचा गुन्हा दाखल :आरोपीचे अत्याचार वाढत गेल्यानंतर शेवटी मुलीने हिंमत दाखवली आणि संपूर्ण घटनाक्रम तिच्या आईला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांकडे जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत बलात्कार आणि गुन्हेगारी धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुडकेश्वर पोलीस या घटनेचा तपास करीत आहे. या घटनेने वाठोडा परिसरात एकच खळबळ उडाली होती.
अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचे चर्चित प्रकरण :शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी नागपूर महानगर पालिकेच्या आपली बस अर्थात स्टार बस धावतात. हजारो शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी यातून ये-जा करतात. अशाच एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर आपली बस च्या ४ कंडक्टरकडून मागच्या ७ महिन्यापासून शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार 7 मार्च 2019 रोजी उघडकीस आला होता. अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटनेमुळे शहरातील शिक्षण घेत असणाऱ्या मुलीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही मुलगी एका महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिची आपली बसचा कंडक्टर असणारा धर्मपाल मेश्राम सोबत ओळखी झाली. पुढे त्यांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले. यानंतर त्यांनी विद्याथिनी सोबत मैत्री करून मानाकापूर रोडवर असणाऱ्या अलेक्सिस हॉस्पिटलजवळील पूजा रेसिडेंसीवर तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांनंतर धर्मपाल यांने आपल्या कंडक्टर मित्रांना देखील या विद्यार्थिनीचा संपर्क करून दिला. त्यांनी पण तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपी आशिष लोखंडे, उमेश मेश्राम, शैलेश वंजारी हे सर्व आपली बसचे कंडक्टर होते.
अन् पीडिता झाली गर्भवती :सात महिन्या नंतर मुलीला आपण गर्भवती असल्याची शंका आली. यामुळे बदनामीच्या भीतीने तिने घरातून पळ काढला. कुटुंबातील लोकांनी तिच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसाच्या तपासात ती रायपूरला असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता तिने आपल्यावरील सर्व अत्याचाराची माहिती पोलिसांच्या समोर उघड केली. पोलिसांनी चारही कंडक्टरना अटक केली होती. पुढील तपास मानाकापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत होते. या घटनेने नागपुरात खळबळ उडाली होती.
हेही वाचा :Vehicle Theft Case In Aurangabad: औरंगाबादमध्ये वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ, 2022 मध्ये 918 वाहनांची चोरी