नागपूर - अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नागपूर शहरातील सक्करदार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सूर्या जांभुळकर नामक आरोपीला अटक केली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणीची आरोपीसोबत फेसबुकवरून ओळख झाली होती. त्यानंतर त्याचे पीडितेच्या घरी देखील येणे-जाणे असल्याचा खुलासा झाला आहे. या प्रकरणात सक्करदार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
फेसबुक मित्राकडून अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून बलात्कार; आरोपीला अटक - नागपूर गुन्हेगारी बातमी
पीडित तरुणी आणि आरोपी सूर्याची ओळख फेसबुकवरून झाली होती. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी मुलीच्या आजीची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान आरोपी सूर्या हा पीडितेला आजारी आजीला भेटायला घेऊन जातो, असे सांगून दुचाकीवर बसवून घेऊन गेला. मात्र, रुग्णालयात न जाता नागपूरपासून लांब जूना कामठीच्या दिशेनं घेऊन गेला. तिथे एका रुममध्ये तिला डांबून सुमारे दोन आठवडे तिला मारहाण करत त्याने तिच्यावर अत्याचार केला.
सक्करधरा पोलीस
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूर्या याने पीडित अल्पवयीन मुलीला सुमारे दोन आठवडे एका घरात डांबून ठेवले होते. आरोपीने पीडितेला मारहाण करत तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सूर्या जांभूळकर याला अटक केली असून सूर्या जांभूळकर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे.
आरोपी अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांच्या ओळखीचा आहे. पीडित तरुणी आणि आरोपी सूर्याची ओळख फेसबुकवरून झाली होती. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी मुलीच्या आजीची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान आरोपी सूर्या हा पीडितेला आजारी आजीला भेटायला घेवून जातो, असे सांगून दुचाकीवर बसवून घेऊन गेला. मात्र, रुग्णालयात न जाता नागपूर पासून लांब जूना कामठीच्या दिशेनं घेवून गेला. तिथे एका रुममध्ये तिला डांबून सुमारे दोन आठवडे तिला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला.
पोलिसांनी केली सुटका
आरोपीने पीडितेला जूना कामठी परिसरातील एका घरी डांबून ठेवले होते. आरोपी घराबाहेर जाताना मोबाईल सोबत घेऊन जायचा आणि बाहेरून दार बंद देखील करायचा. मात्र, दोन दिवसांपूर्वी आरोपी मोबाईल घरी विसरून गेला आणि मुलीनं घराच्यांशी संपर्क साधून सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत अल्पवयीन मुलीला डांबून ठेवलेली रूम शोधून काढली आणि पीडितेची सुटका केली. आरोपी सूर्या हा पोलिसांच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.
हेही वाचा-धक्कादायक! फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, आरोपी गजाआड