महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

न्याय मिळवून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे - रंजन गोगोई - अखिल भारतीय संमेलन नागपूर

देशातील गरजू व्यक्तीला गुणवत्तापूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून गरजू व्यक्तींपर्यंत कायदेविषयक महत्त्वाची माहिती पोहोचवता येऊ शकते- रंजन गोगोई

रंजन गोगोई

By

Published : Aug 18, 2019, 8:04 PM IST

नागपूर- देशातील गरजू व्यक्तीला गुणवत्तापूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून गरजू व्यक्तींपर्यंत कायदेविषयक महत्त्वाची माहिती पोहोचवता येऊ शकते. तुम्ही किती लोकांना विधी सेवा दिली हे महत्त्वाचे नाही. पण तुम्ही गरजूंना किती गुणवत्तापूर्ण विधी सेवा दिली हे महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी व्यक्त केले. ते राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या अखिल भारतीय संमेलनाच्या समारोपात बोलत होते.

रंजन गोगोई
तरुण पिढीमध्ये कायदेविषयक जागृती करणे महत्वाचे आहे. कायदेविषयक ज्ञानाचा समाजासाठी कसा उपयोग करता येईल, याची जाणीव कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना करुन दिल्यास त्यांच्यात समाजहितासाठी कार्य करण्याची भावना निर्माण होऊ शकते, असे मत सरन्यायाधीश रंजन कुमार गोगोई यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details