महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपुरातील रामगिरी बंगला सज्ज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपुरातील रामगिरी बंगला हा मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आहे, तर देवगिरी बंगला उपमुख्यमंत्र्यांना दिला जातो. आता हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपुरात येणार आहेत. त्यामुळे रामगिरी बंगला त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.

ramgiri bungalow ready for CM uddhav thackeray welcome
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपुरातील रामगिरी बंगला सज्ज

By

Published : Dec 10, 2019, 4:28 PM IST

नागपूर -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी नागपुरातील शासकीय निवासस्थान असलेला रामगिरी बंगला सज्ज झाला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी बदलून नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपुरातील रामगिरी बंगला सज्ज

शहरातील रामगिरी बंगला हा मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असतो, तर देवगिरी बंगला उपमुख्यमंत्र्यांना दिला जातो. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. यामध्ये मुख्यमंत्री आणि इतर ६ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, अद्यापही खातेवाटप झालेले नाही. तसेच मंत्रीमंडळाचा विस्तारही झालेला नाही. त्यामुळे इतर मंत्र्यांना बंगले मिळाले नाही. मात्र, मुख्यमंत्री ठाकरेंच्या स्वागतासाठी रामगिरी बंगला सज्ज झाला आहे. येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्या काळात मुख्यमंत्र्यांचा मुक्काम याच बंगल्यावर असणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने देखील या बंगल्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.

हे वाचलं का? - थरारक... शेकडोंच्या डोळ्यादेखत एका प्रेमाचा करुण अंत

ABOUT THE AUTHOR

...view details