नागपूर : रविभवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मंगळवारी रामदास आठवले यांनी संवाद साधला. २०१८ साली पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी बोलवावे, अशी मागणी केली आहे. संदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भीमा-कोरेगाव दंगली प्रकरणी आयोग चौकशी करीत आहे. या प्रकरणात कुणाला चौकशीसाठी बोलवावे हा आयोगाचा निर्णय आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दंगलीला नियंत्रित करण्यासाठी योग्य ते पाऊले उचलली होती. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी केलेली मागणी योग्य नसल्याचे रामदास आठवले म्हणाले आहेत.
लोकसभेच्या दोन जागा मिळाव्यात :पुढील वर्षी देशात लोकसभा निवडणूक होणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील 48 पैकी दोन जागा या रिपब्लिकन पक्षाला भाजपने द्याव्यात, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. राहुल गांधी परदेशात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भूमिका मांडत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असेही ते म्हणाले आहेत. ते 6 जून रोजी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.