नागपूर - बुधवारी (5 ऑगस्ट) होणाऱ्या राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू असल्यासचे पहायला मिळत आहे. नागपुरातही भारतीय जनता पक्षाकडून राम मंदिराच्या भूमीपुजन होणार असल्याने पूर्व नागपुरात जल्लोश करण्यात आला. शिवाय 5 ऑगस्टला शहरातील विविध मंदिरामध्ये रामायणाचे वाचन व घरोघरी भगवे झेंडे वाटप करण्यात येणार असल्याचे भाजपा आमदार कृष्णा कोपडे यांनी सांगितले.
'राम मंदिराच्या भूमीपूजनादिवशी घरोघरी वाटणार भगवे झेंडे' - नागपूर आमदार कृष्णा कोपडे बातमी
बुधवारी (दि. 5 ऑगस्ट) होणाऱ्या राम मंदिर भूमीपुजनासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व नागपुरातील विविध मंदिरात रामायणाचे वाचन करण्यात येणार असून घरोघरी भगवे झेंडे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार कृष्णा कोपडे यांनी दिली.
अयोध्या येथील राम मंदिराचे येत्या 5 ऑगस्टला भूमीपुजनाचे कार्यक्रम होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशभरात जल्लोश व आनंद साजरा केला जात आहे. नागपुरातही भाजपकडून ढोल ताशा वाजवत जल्लोश साजरा करण्यात आला. शिवाय गेल्या कित्येक वर्षांपासून राम मंदिरासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे आज राम मंदिर उभे राहणार आहे. हा क्षण आनंदोत्सव साजरा करण्याचा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी दिली.
5 ऑगस्टला शहरातील प्रत्येक मंदिरात रामायण पठनाचे कार्यक्रमसुद्धा योजले असल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडत आहे. त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये व पूर्व नागपुरात 51 ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे खोपडे यांनी सांगितले. तसेच पूर्व नागपुरातील महत्वाच्या ठिकाणी 500 किलो लाडू वाटपाचा कार्यक्रम करणार असल्याचेही यावेळी कृष्णा खोपडे यांनी सांगितले. त्याचबरोबर शहरात भगवे झेंडे वाटप करून संपूर्ण शहर भगवेमय करणार असल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले. त्याचबरोबर प्रत्येक मंदिरात राम कथेचे आयोजन देखील होणार असल्याचे खोपडे यांनी सांगितले.