वारंगणांच्या वस्तीत रक्षाबंधन साजरा होताना नागपूर : बहीण भावाच्या प्रेमळ आणि हळव्या नात्याला रेशमी बंधनात बांधणारा सण म्हणजे रक्षाबंधन. आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचं वातावरण असताना नागपूर येथील वारंगनांची वस्ती गंगा- जमुना ओसाड पडलीय. भावाच्या प्रतीक्षेत असलेल्या वारंगनांची राखी पौर्णिमा या ही वर्षी प्रतीक्षा करण्यातच जाईल, अशी परिस्थिती आहे. समाजाच्या तिरस्कारामुळे आधीचं दुरावलेल्या आणि दुखावलेल्या या वारंगनांना त्यांच्या कुटुंबानं, भावांनी देखील अंतर दिल्यानं त्यांच्या हळव्या मनावर काय परिणाम होतो, हे इथे जाऊन अनुभवल्याशिवाय कळणारच नाही. त्यामुळे यंदाचं रक्षाबंधन ईटीव्ही भारतनं गंगा जमुना या वारंगणांच्या वस्तीत जाऊन अनुभवलय.
वारंगणांच्या वस्तीत रक्षाबंधन साजरा होताना आता भाऊ म्हणावं तरी कोणाला हा मोठा प्रश्न :भावाच्या मनगटावर राखी बांधावी, त्याला औक्षण करत त्याच्याकडून सुरक्षेची हमी घ्यावी असं इथं राहणाऱ्या प्रत्येक वारांननेला वाटतं. पण समाज आम्हाला वाळीत टाकल्यासारखी वागणूक देत आल्याने कोणत्याही वारंगनेचा भाऊ रक्षाबंधनाला इकडे फिरकत देखील नसल्याची खंत अनेक वारांगनांनी बोलून दाखवली आहे. एकीकडे हक्काची नाती परकी झाली असताना स्वतःच्या कुटुंबानं देखील पाठ फिरवल्यामुळे आता भाऊ म्हणावं तरी कोणाला हा मोठा प्रश्न या वारंगनांच्या समोर आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी तरी या प्रश्नांचे उत्तर मिळावे अशी प्रत्येक वारांगनेची मनोमन इच्छा आहे.
आम्ही देखील हाडामासांची माणसं आहोत. आम्हाला भावना आणि मन आहे. परंतु या 'सभ्य' समाजासाठी आम्ही उपभोगाची वस्तू झालो आहोत. आम्हाला ही वाटतं की आमच्या भावांनी यावं, आमच्याकडून राखी बांधून घ्यावी. पण त्यांचा देखील नाईलाज होत असावा -वारांगना
विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी सुरू केली परंपरा : वारांगनाना सहसा कुणी आपली बहीण म्हणवून घेणार नाही. कारण तथाकथित सभ्य समाजात या वारांगना अत्यंत तुच्छ समजल्या जातात. नागपूरचे दिवंगत खासदार विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी सलग ५० वर्ष वारांगनांकडून राखी बांधून घेतली होती. २०१७ मध्ये भाऊ जांबुवंतराव धोटे यांचं निधन झाल्यानंतर त्यांची कन्या ज्वाला धोटे यांनी वडिलांनी सुरू केलेली परंपरा कायम ठेवली आहे. त्या गेल्या सात वर्षांपासून गंगा जमुना वस्तीत जाऊन वारांगनांकडून राखी बांधून घेतात.
वारंगणांच्या वस्तीत रक्षाबंधन साजरा होताना - बहिणीच्या रुपात मिळाला भाऊ : गेल्या ३ वर्षांपासून गंगा-जमुना वारांगनांच्या वस्तीवर नागपूर पोलिसांचा खडा पहारा आहे. अनेकदा उपासमारीची कठीण वेळ शेकडो वरांगनांवर आली आहे. त्यांच्या हक्कासाठी कायदेशीर लढाई ज्वाला धोटे या लढत असल्याने आता गंगा-जमुना वस्तीतील वारांगना त्यांना भाऊ मानून राखी बांधत आहेत.
हेही वाचा :
- Raksha Bandhan 2023 : विद्यार्थ्यांनी 'इस्रो'च्या शास्त्रज्ञांना राखी केली समर्पित; पाहा व्हिडिओ
- Raksha Bandhan Muhurat २०२३ : 'या' मुहूर्तावर करा यंदा रक्षाबंधन; एक तासच आहे वेळ
- Raksha Bandhan 2023 : जोरात बोला, मी शिंदे समर्थक आणि मोफत राखी घ्या...; मुख्यमंत्र्यांच्या राखीला मोठी मागण