महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा प्रचारात राखीचा धागा ठरेल महत्त्वाचा; मुख्यमंत्र्यांसाठी नागपूरवरून २ लाख राख्या - election

भाजपच्या महिला पदाधिकारी घरोघरी जाऊन महिलांकडून राखी घेणार आहेत. या माध्यमातूम मुख्यमंत्र्यांना 2 लाख राख्या पाठविण्यात येणार आहेत.

कीर्तिदा अजमेरा

By

Published : Aug 1, 2019, 3:17 PM IST

नागपूर- येत्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता राजकीय पक्ष रणांगणात उतरत आहेत. अशात रक्षाबंधनाचे औचित्य साधून नागरिकांना पक्षासोबत जोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर शहरातून दोन लाख राख्या पाठविणार असल्याची माहिती भाजप महिला मोर्चाने दिली आहे.

मुख्यमंत्र्यांसाठी नागपूर वरून २ लाख राख्या पाठवणार

शहरातील प्रत्येक बुथवरून शंभर राख्या म्हणजेच एका विधानसभा मतदारसंघातून सुमारे ३५ हजार राख्या पाठविण्यात येणार आहेत. यासाठी भाजपच्या महिला पदाधिकारी या घरोघरी जाऊन महिलांकडून राखी घेणार आहेत. तसेच या माध्यमातून सदस्य नोंदविण्याची प्रक्रिया देखील पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीकरिता भाजपने प्रचारासाठी राखीचा धागा पुढे केल्याचे दिसतेय.

भाऊ म्हणून राखी बांधणाऱ्या बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे, असे भाजप महिला अध्यक्षा कीर्तिदा अजमेरा आणि सरचिटणीस अर्चना देहणकार यांनी सांगितले

ABOUT THE AUTHOR

...view details