नागपूर- सिंचन घोटाळ्याचे सत्य पुढे आले पाहिजे. कोट्यवधीचा निधी खर्च होऊन देखील कुठे सिंचन दिसून येत नाही. त्यामुळे याला जबाबदार कोण? हे पुढे आलंच पाहिजे. यासाठी या घोटाळा प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. ते नागपुरात बोलत होते.
'कोट्यवधीचा निधी खर्च झालाय.. सिंचन घोटाळ्याचे सत्य पुढे आलेच पाहिजे' - अजित पवार
कर्जमाफीच्या आकड्यांमध्ये तफावत असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे. फडणवीस सरकारनेकर्जमाफी संदर्भांत लबाडी केली. त्यानंतर आत्ताचे सरकारदेखील लबाडी करत आहे. मात्र गेल्या सरकारच्या तुलनेत हे सरकार कमी लबाड असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी महाविकास आघाडीला लगावला आहे.
शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी आणि त्यासाठी लावलेले निकश यामुळे ६ ते ७ हजार कोटी पेक्षा जास्तीची कर्ज माफी होऊ शकत नाही. मात्र, दुसरीकडे अर्थमंत्री जयंत पाटील हे ३१ हजार कोटींची कर्ज माफी दिल्याचा दावा करतात. एक तर कर्जमाफीच्या आकड्यांची बेरीज सांगावी, अथवा कर्जमाफीचे निकष बदलावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच कर्जमाफीच्या आकड्यांमध्ये तफावत असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे. फडणवीस सरकारनेकर्जमाफी संदर्भांत लबाडी केली. त्यानंतर आत्ताचे सरकारदेखील लबाडी करत आहे. मात्र गेल्या सरकारच्या तुलनेत हे सरकार कमी लबाड असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी महाविकास आघाडीला लगावला आहे.