महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'राजगृह' तोडफोड प्रकरण : आरोपींना तात्काळ अटक करा, भाजपाकडून निदर्शन - bjp on rajgruha vandalism case

मुंबईतील दादर येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान 'राजगृह' यावर काही अज्ञातांनी तोडफोड केल्याने सर्वत्र निषेध निदर्शने करण्यात येत आहे. नागपूरातही भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित मोर्चाकडून या घटनेचा निषेध करण्यात आला. नागपूरातील संविधान चौकात हे निदर्शन करण्यात आले.

nagpur bjp
'राजगृह' तोडफोड प्रकरण : आरोपींना तात्काळ अटक करा, भाजपाकडून निदर्शनं

By

Published : Jul 9, 2020, 9:43 AM IST

नागपूर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील 'राजगृह' निवासस्थानाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ नागपूरात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाकडून निदर्शन करत निषेध करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तमाम दलितांचे श्रध्दास्थान असून त्यांच्या वास्तूवर झालेला हल्ला सहन करून घेतला जाणार नाही, सोबतच या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक झालीच पाहिजे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

मुंबईतील दादर येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान 'राजगृह' यावर काही अज्ञातांनी तोडफोड केल्याने सर्वत्र निषेध निदर्शने करण्यात येत आहे. नागपूरातही भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित मोर्चाकडून या घटनेचा निषेध करण्यात आला. नागपूरातील संविधान चौकात हे निदर्शन करण्यात आले.

धर्मपाल मेश्राम बोलताना...

तमाम दलितांचे श्रध्दास्थान असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'राजगृह'वर ज्या समाजकंठकांनी तोडफोड केली आहे. त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे, कारण अशा कृत्यांना वेळीच आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी यावेळी भाजपाकडून करण्यात आली. सोबतच महाराष्ट्र शासनाने या प्रकरणात अद्यापही कार्यवाही न केल्याचे सांगत शासनाचाही निषेध यावेळी करण्यात आला.

ही फक्त घटना नसून मानवतेला काळीमा फासणारे कृत्य असल्याचे भाजपा अनुसूचित मोर्चा नागपूर शहराध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले. त्याचबरोबर असे कृत्य वारंवार होत राहिले तर या देशातील दलित पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनांनी या आरोपींना तात्काळ अटक करून धडा शिकवलाच पाहिजे, अशी मागणीही मेश्राम यांनी केली.

हेही वाचा -लॉकडाऊनंतर व्यायामासाठी सायकलचा वापर, प्रत्येक दुकानातून दिवसाला २५ ते ३० सायकलची विक्री

हेही वाचा -सावकाराचे कर्ज वडील कसे फेडणार या विवंचनेतून 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या, नागपूर जिल्ह्यातील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details