नागपूर -मागील तीन दिवसांपासून शांत असलेल्या पावसाने नागपुरात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा पसरल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी बरसलेल्या पावसामुळे शहरातील तलाव तुडुंब भरले होते. अशात आता पुन्हा बरसलेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणातही बदल दिसून येत आहे.
नागपुरात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाची हजेरी - नागपूर ताज्या बातम्या
मागील तीन दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज नागपुरात दमदार हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे.
राज्यात यावर्षी अपेक्षित पाऊस बरसल्या चित्र आहे. सर्वत्र समाधानकारक वातावरण पहायला मिळत आहे. नागपुरातही मागील तीन दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील वातावरणात कमालीचा बदल पहायला मिळत आहे. मागील तीन दिवसांपासून नागपुरात ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. अशात मुसळधार बरसलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी देखील साचल्याचे पहायला मिळाले. नागपुरात हवामान विभागाने दिलेल्या अंदाजा प्रमाणे पाऊस होत आहे. विशेष म्हणजे या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांना देखील दिलास मिळाल्याचे चित्र आहे. सोबतच मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे परिसरातील छोटे नाले व तलाव भरून वाहू लागले आहेत.
मेघ गर्जनेसह बरसणाऱ्या पावसामुळे नागरिकांचे काही प्रमाणात धावपळ देखील झाल्याचे दिसून आले. मात्र, कोरोनामुळे नागपूरकरांनी घरातूनच पावसाचा आनंद लुटला.