महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात हलक्या पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना प्रतीक्षा मुसळधारेची - ओल्याचिंब भिजल्या

नागपुरात ढगाळ वातावरण असल्याने आज पावसाच्या सरी कोसळतील अशी आशा नागपूरकरांना होती. त्यानुसार सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने नागपूरकरांच्या अपेक्षा ओल्याचिंब भिजल्या आहेत.

नागपुरात हलका पाऊस

By

Published : Jun 22, 2019, 9:00 PM IST

नागपूर- आज सकाळपासून नागपुरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे आज पावसाच्या सरी कोसळतील अशी आशा नागपूरकरांना होती. त्यानुसार सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने नागपूरकरांच्या अपेक्षा ओल्याचिंब भिजल्या आहेत. नागपुरकरांनी पावसाचा आनंद घेतला असला तरी दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षाच आहे.

पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात पावसाची दमदार हजेरी लागेल अशी शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली होती. आज त्यांचा अंदाज काही अंशी खरा ठरला असला तरी दमदार पाऊस झालेला नाही. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसाने केवळ शहरातील रस्ते ओले झाले. पण त्यामुळे दमट वातावरण तयार झाले आहे. आज अर्धा तास पाऊस बरसला असला तरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतिक्षेत नागपूरकर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details