महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेस पक्षाला संपवण्यासाठी राहुल आणि सोनिया गांधी पुरेसे- साक्षी महाराज - mp sakshi maharaj meet mohan bhagwat

खासदार साक्षी महाराज हे संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्यासाठी आले होते. भेट झाल्यावर त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

साक्षी महाराज
साक्षी महाराज

By

Published : Aug 25, 2020, 9:52 PM IST

नागपूर- काँग्रेस पक्षाला संपवण्यासाठी सोनिया आणि राहुल गांधी हे दोघेच पुरेसे आहेत. त्याकरिता बाहेरील कुणाचीही गरज भासणार नाही, असा टोला भारतीय जनात पक्षाचे नेते व खासदार साक्षी महाराज यांनी आज लगावला आहे.

प्रतिक्रिया देताना भाजप नेते व खासदार साक्षी महाराज

ते संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्यासाठी आले होते. भेट झाल्यावर त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. देशातील विरोधक स्वतःच्या कर्माने संपू लागले आहेत. देशाच्या राजकारणात विरोधकच नाहीत, हे देशाचे दुर्भाग्य असल्याचे देखील साक्षी महाराज म्हणाले.

हेही वाचा-आयुक्त मुंढे यांनी केलेल्या खोट्या दाव्यांची सत्यता पुढे आणणार - महापौर

ABOUT THE AUTHOR

...view details