महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Radhakrushna Vikhe Patil : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नसून ही तर नेत्यांची जत्रा - राधाकृष्ण विखे पाटील

राज्यसभा खासदार संजय राऊत यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर ( Sanjay Raut bail ) केला आहे. यावर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Minister Radhakrushna Vikhe Patil ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना जामीन मिळणे ही न्यायलयीन प्रक्रिया आहे, त्यावर काही भाष्य करणार नाही. पूर्ण निकाल आल्यानंतर त्यावर भाष्य करता येईल, असे ते म्हणाले आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 9, 2022, 9:43 PM IST

नागपूर : राज्यसभा खासदार संजय राऊत यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर ( Sanjay Raut bail ) केला आहे. यावर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Minister Radhakrushna Vikhe Patil ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना जामीन मिळणे ही न्यायलयीन प्रक्रिया आहे, त्यावर काही भाष्य करणार नाही. पूर्ण निकाल आल्यानंतर त्यावर भाष्य करता येईल, असे ते म्हणाले आहेत.

असुरी आनंद व्यक्त केला जात आहे - संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर शिवसेनेकडून जल्लोष केला जातो आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की महाविकास आघाडी एक प्रकारे असुरी आनंद व्यक्त करत आहे. स्वतःचे अपयश झाकण्याचा महाविकास आघाडीचे नेते प्रयत्न करत आहे. पण जे वास्तव्य आहे ते मान्य केले पाहिजे.


महसूल विभागातील बदल्या - महसूल विभागातील बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहे. दुसऱ्या टप्प्यात सुद्धा बदल्या होईल. मध्यंतरी दोन वर्ष कोरोनामुळे बदल्या होऊ शकला नाही. काही लोकांचे विनंती अर्ज आहे, ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते लवकर बदल्या होईल.


नेत्यांची जत्रा - भारत जोडो यात्रा म्हणजे एक प्रकारचा शो आहे. यामध्ये जनता समाविष्ट झालेली नसून नेते सामिल झालेले आहे. ज्यांची विश्वासार्हता जनतेमधून संपली आहे ते लोक सामील होत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था बिकट आहे. स्वतःचे अस्तित्व गमावलेले राहुल गांधी स्वतःच्या प्रतिमेला उजळण्याचा प्रयत्न यात्रेतून करत आहेत. भारत जोडो यात्रा नसून ही तर नेत्यांची जत्रा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details